Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवराय अखिल विश्वाचे प्रेरणास्थान : संजय वाघ | Sanjay Wagh statement about Chhatrapati Shivaji maharaj Inspiration | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhatrapati shivaji maharaj

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवराय अखिल विश्वाचे प्रेरणास्थान : संजय वाघ

पाचोरा (जि. जळगाव) : ‘हिंदवी स्वराज्याची खरी ताकद गडकिल्लेच होती. आजही अनेक सरदार व मावळ्यांच्या शौर्य, साहस व पराक्रमाची साक्ष हे गडकिल्ले देतात म्हणूनच महाराष्ट्रात

किंवा महाराष्ट्र बाहेर कुठल्याही गड किल्ल्यावर गेले तर तेथील मावळ्यांच्या व शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास पाहून नवीन ऊर्जा व प्रेरणा मिळते. (Sanjay Wagh statement about Chhatrapati Shivaji maharaj Inspiration jalgaon news)

त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज हे अखिल विश्वाचे प्रेरणास्थान आहेत, अशा आशयाचे प्रतिपादन पीटीसी संस्थेचे चेअरमन तथा शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संजय वाघ यांनी केले. पीटीसी संस्थेच्या एम. एम. महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त आयोजित गड किल्ले या विषयावरील पोस्टर प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

इतिहास विभागातर्फे प्रा. माणिक पाटील यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांची गड किल्ले या विषयावर आधारित स्पष्ट स्पर्धा घेण्यात आली. त्यास चांगलाच प्रतिसाद लाभला. इतिहास विभागाच्या अनेक विद्यार्थ्यांनी आकर्षक पोस्टर रंगवून त्याचे प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी संजय वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

यावेळी सतीश चौधरी, संजय सूर्यवंशी, माजी प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, डॉ. वासुदेव वले, प्रा. जी. बी. पाटील, प्रा. डॉ. जे. डी. गोपाळ, प्रा. एस. टी. सूर्यवंशी, प्रा. एन. वाय. पाटील, प्रा. डॉ. के. एस. इंगळे, प्रा. पी. एम. डोंगरे, प्रा. डॉ. एस. बी. तडवी, प्रा.डॉ. माणिक पाटील, प्रा. राजेश वळवी, प्रा. वाय. बी. पुरी, प्रा.गौरव चौधरी, प्रा.पी. व्ही. देसले,

प्रा.महेश माळी, प्रा.सुनीता सोहत्रे, प्रा. विजया देसले, प्रा. छाया पाटील, प्रा. प्राजक्ता शितोळे, प्रा.स्वप्नील ठाकरे, प्रा. एम व्ही पाटील, प्रा. संदीप पवार, प्रा. एम. एम. माळी, प्रा. एम. के. पाटील, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. रोहित पवार, प्रा. स्वप्नील पाटील,

मच्छिंद्र पाटील, घनश्याम करोसिया, जावेद देशमुख आदी उपस्थित होते. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून जयघोष करत अभिवादन करण्यात आले. प्रा. डॉ. माणिक पाटील यांनी प्रास्ताविक करून आभार मानले. प्रा. डॉ. के. एस. इंगळे यांनी सूत्रसंचलन केले.