Jalgaon News : सिंचनासाठी उतावळी नदी बहुळाला जोडणार

During Bhoomipujan of Bahula Dam Krishna Park
During Bhoomipujan of Bahula Dam Krishna Parkesakal

नांद्रा (जि. जळगाव) : पाचोरा तालुक्यातील बिल्दी येथील बहुळा धरणालगत असणाऱ्या सुमारे चार एकरमध्ये पाच कोटी रुपये खर्चाच्या व काही दिवसांपूर्वी नामकरण केलेल्या ‘कृष्णा सागर’

पार्कचे भूमिपूजन सोमवारी (ता. २०) आमदार किशोर पाटील (Kishore Patil) यांच्या हस्ते झाले. (Utavali river connect to Bahula for irrigation jalgaon news)

याप्रसंगी व्यासपीठावर प्रांताधिकारी डॉ. विक्रम बादल, तहसीलदार कैलास चावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, माजी जिल्हा परिषद सदस्य पदमसिंह पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग (जळगाव) कार्यकारी अभियंता प्रशांतकुमार येळाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे डी. एम. पाटील, एसएसपी कंन्ट्रक्शनचे

संजय पाटील, बाजार समितीचे शिवदास पाटील, डॉ. भरत पाटील, (स्व.) के. एम. (बापू) पाटील यांचे सुपुत्र अनिल पाटील व नातू जयदेव पाटील, अनिल धना पाटील, माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, राजेंद्र तायडे, नंदू सोमवंशी, किशोर बारावरकर, योगेश पाटील,

बहुळाचे अभियंता नंदकुमार शेवाळे, राम केसवानी, माजी सभापती सुभाष पाटील, चंद्रकांत धनवडे, गणेश पाटील, सुभाष तावडे, शिवाजी तावडे, बिल्दी उपसरपंच नीलेश पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

During Bhoomipujan of Bahula Dam Krishna Park
Jalgaon News : थरार एखाद्या चित्रपटाला शोभणारा; बदल्यासाठी पिस्तूलसह बुरखा घालत थेट कोर्टात

तहसीलदार कैलासजी चावडे यांनी आपल्या भाषणात सांगितले, की आमदार किशोर पाटील यांनी (स्व.) के. एम. (बापू) पाटील यांचे नाव या पर्यटनस्थळला देऊन मनाचा केलेला मोठेपणा लोक कायम स्मरणात ठेवतील. त्यानंतर संपूर्ण पर्यटनस्थळाचा आराखडा सुजितकुमार वर्मा यांनी समजावून सांगितला. त्यामध्ये नैसर्गिक वातावरणात व संपूर्ण लेव्हल करून पेव्हर ब्लॉक,

हॉर्टिकल्चर, लँडस्केपिंग गार्डन, पाण्याचा धबधबा, चौपाटीची व्यवस्था तेथे खाद्यपदार्थांची दुकाने, अत्याधुनिक स्वच्छतागृह, प्रशस्त वाहनतळ असा एकत्रित हा पूर्ण साडेतीन ते चार एकरमध्ये प्रकल्प आपण साकारणार असल्याचे सांगितले. मधुकर काटे यांनी या पर्यटनास्थळाबद्दल गौरोदगार काढून अजून २० ते २५ कोटी अतिरिक्त निधी आमदार पाटील यांनी आणून भव्य दिव्य पर्यटनस्थळ येथे करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणात आमदार किशोर पाटील यांनी पर्यटनाबरोबरच या ठिकाणी शेती सिंचनालाही मुबलक पाणी मिळावे, यासाठी परिसरातील खेड्यातील शेतकऱ्यांच्या कॅनल व पाटचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली. पर्यटनस्थळ पूर्ण होण्यापूर्वी प्रलंबित उतावळी नदी बहुळा धरणाला जोडण्याचे २००७ ला के. एम बापूंनी बघितलेले स्वप्न, आपण पूर्ण करणार असल्याचा विश्‍वास आमदार पाटील यांनी दिला.

During Bhoomipujan of Bahula Dam Krishna Park
Jalgaon News : भुसावळचा इतिहास ‘खून का बदला खून’; पोलिस यंत्रणाही त्यापुढे हतबल!

माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रवीण ब्राह्मणे यांनी सूत्रसंचालन केले. तर गणेश पाटील यांनी आभार मानले. यावेळी परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी, शिवसेना पदाधिकारी, अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व पत्रकार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवस्मारकासाठी तीन लाख रुपये

पर्यटनस्थळी (स्व.) के. एम. बापू व श्रीकृष्ण भगवान यांचा पुतळा बसवून कोकणच्या धर्तीवरील सुंदर झाडे, वेली, बागा निर्माण करून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून आणखी २० ते २५ कोटी रुपये पुढील काही वर्षात आणण्याची घोषणा त्यांनी केली.

याबरोबर शिवजयंतीनिमित्त प्रत्येक गावाला शिवस्मारकासाठी तीन लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. या बरोबरच मासेमारींसाठी मत्स्य पूरक व्यवसाय व बोटिंग व्यवस्था कशी करता येईल, याविषयी योजना आणण्याचे सांगितले.

During Bhoomipujan of Bahula Dam Krishna Park
Board Exam : बारावीच्या परीक्षेच्या तोंडावर शिक्षकेतर कर्मचारी संपावर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com