Jalgaon News : संत नामदेव महाराज 673 वा संजीवन सोहळा शनिवारी

Sant Namdev
Sant Namdev Esakal

Jalgaon News : येथील एकता शिंपी समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे शनिवारी (ता. १५) संत शिरोमणी नामदेव महाराजांचा ६७३ वा संजीवन समाधी सोहळा होणार आहे. संस्थेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबत नियोजन करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत जगताप अध्यक्षस्थानी होते. सुरवातीला दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संजीवन समाधी सोहळा बालाजी पेठेतील बालाजी मंदिरात करण्याचे ठरले. (Sant Namdev Maharaj Sanjivan Sohala on 15 july jalgaon news)

संस्थेतर्फे समाजातील ज्येष्ठांचा विशेष सन्मान होणार असून, समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यवाटप होणार आहे.

संस्थेतर्फे वर्षभरात विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्याबाबत विशेष ठराव करण्यात आला. महिला मंडळातर्फे विविध कार्यक्रम होणार असल्याचे महिला अध्यक्षा सारिका शिंपी यांनी सांगितले. संतांची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सुभाष चौकातील भवानी मंदिरापासून सकाळी नऊला शोभायात्रेला सुरवात होईल.

यात समाजाच्या महिला टाळ-मृदंगाच्या गजरात संत नामदेव महाराजांचा गजर करतील. लेझीम नृत्य शोभायात्रेचे आकर्षण राहील.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sant Namdev
Kapaleshwar Temple Trustees : कपालेश्वर संस्थांचा कारभार नव्या विश्वस्तांकडे सुपूर्द

समाजबांधवांनी जास्तीत जास्त संख्येने शोभायात्रेत सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत जगताप, सचिव सुजित जाधव, महिला अध्यक्षा सारिका शिंपी यांनी केले.

उपाध्यक्ष जितेंद्र कापडणे, कोशाध्यक्ष प्रशांत कापुरे, सहसचिव सोमनाथ बाविस्कर, प्रसिद्धिप्रमुख शरद कापुरे, महिला सचिव रेखा कापडणे, ॲड. वनिता सोनवणे, संस्थेचे माजी अध्यक्ष एकनाथ बाविस्कर, हेमंत निकुंभ, दीपक निकुंभ, किशोर निकुंभ, साहेबराव सोनवणे, सतीश सोनवणे, श्रीराम सोनवणे, ॲड. शुभम सोनवणे व समाजबांधव उपस्थित होते. सुजित जाधव यांनी आभार मानले.

Sant Namdev
Sant Namdev Punyatithi : नामदेव महाराजांचा थोडक्यात जिवन प्रवास...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com