एरंडोल तालुक्यात नऊ ठिकाणी ‘महिला राज’ 

अल्हाद जोशी
Saturday, 13 February 2021

ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामस्थांनी सर्व जागांवर संधी दिल्यामुळे याठिकाणी महिलाराज आले आहे.

एरंडोल : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. सर्व सोळा ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी बिनविरोध निवड झाली तर १५ ठिकाणी उपसरपंचपदाची निवड बिनविरोध झाली. आडगाव येथे उपसरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. अनेक ग्रामपंचायतीत भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला वापरण्यात आला. 

आवश्य वाचा- धक्कादायक! पिता-पुत्राचे सुरू होते भांडण; वडिलांनी चाकु हिसकावताच घडले भयंकर

 

तालुक्यातील शुक्रवारी सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक झालेली गावे पुढीलप्रमाणे : कासोदा- सरपंच- महेश पांडे, उपसरपंच- सय्यद नाजीम अली हाजी अहमद अली, आडगाव- सरपंच दिलीप भिल, उपसरपंच दिलीप पवार, उमरदे- सरपंच सुरेखा पाटील, उपसरपंच-बाजीराव हटकर, खेडी खुर्द- सरपंच वैशाली कोळी, उपसरपंच-मीनाक्षी कोळी, भातखेडे- सरपंच- आशा पाटील, उपसरपंच- शिवाजी पाटील, खडके खुर्द- सायली पाटील, उपसरपंच अशोक पाटील, उत्राण अहिर हद्द- शारदा पाटील, उपसरपंच मंगला कोळी, हणमंतखेडे मजरे-सरपंच- छाया सोनवणे, उपसरपंच- सुनंदा बोरसे, फरकांडे- सरपंच निर्मला पाटील, उपसरपंच शरद ओतारी, पिंप्री बुद्रूक- सरपंच- कैलास सोनावणे, उपसरपंच- सुभाष पाटील, गालापूर- सरपंच महेंद्र महाजन, उपसरपंच अर्जुन मोरे, ताडे- सरपंच सचिन पाटील, उपसरपंच बेबीबाई पाटील, खर्ची खुर्द- सरपंच- रखमा मराठे, उपसरपंच- ममता पाटील, जवखेडे बुद्रुक- सुनीता महाजन, उपसरपंच रंजना पाटील, वैजनाथ-सरपंच- नाना पाटील, उपसरपंच- सुनीता पाटील, पिंपळकोठा खुर्द-सरपंच- कोकिळा हटकर, उपसरपंच- जयश्री बडगुजर. सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.

आवर्जून वाचा- महामार्गावरील मनमोहक, निसर्ग सौंदर्य प्रवास अनुभवचायं; तर जाणून घ्या, भारतातील सुंदर १० महामार्गांची माहिती !

सर्व ठिकाणी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे, कासोद्याचे सहाय्यक निरीक्षक रवींद्र जाधव, उपनिरीक्षक एन. आर. ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. आडगाव येथे उपसरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये दिलीप पवार हे तेरा मते मिळवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी स्वप्नील पाटील यांना केवळ तीन मते मिळाली. जवखेडे बुद्रूक येथे ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामस्थांनी सर्व जागांवर संधी दिल्यामुळे याठिकाणी महिलाराज आले आहे.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sarpanch selection marathi news erandal distric nine gram panchayats woman sarpanch