
Jalgaon News : मुक्ताईनगरच्या शक्तिकेंद्रावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकल्याचा आनंद
कुऱ्हा काकोडा (ता. मुक्ताईनगर) : दूध संघातील पराभवामुळे नाथाभाऊ संपला अशी हाकाटी विरोधकांनी पिटली. मात्र, मुक्ताईनगर तालुक्याचे राजकीय शक्तिकेंद्र असलेल्या कुऱ्हा ग्रामपंचायतीत जनतेने आस्मान दाखवले. राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत देऊन लोकनियुक्त सरपंच म्हणून डॉ. बी. सी. महाजन यांना निवडून दिले.
भाजपच्या प्रदेशस्तरावरील नेतमंडळींनी इथे ठाण मांडले होते. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. जनतेतेने त्यांना झिडकारून लावले आहे. आता राष्ट्रवादीचा विजयाचा वारू चौखुर उधळणार हे नक्की, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या कुऱ्हा (ता.मुक्ताईनगर) ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पुरस्कृत ग्रामविकास पॅनलचा झेंडा लागून लोकनियुक्त सरपंचासह सतरापैकी तेरा सदस्य विजयी झाले. त्यानिमित्ताने विजयाचा जल्लोष आणि जनता जनार्दनाचे आभार मानण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. डॉ. बी. सी. महाजन यांना विरोधकांनी घेरण्याची व्ह्यूहनीती आखली. (Shakti Kendra of Muktainagar winner is NCP Jalgaon News)
हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच...
हेही वाचा: Nashik News:...अन् दुकानावर नायलॉन मांजा बंदीचे फलक झळकले! विक्रेत्यांवर तिसरा डोळा
मात्र त्यांनी हे चक्र भेदून भल्याभल्यांना विचार करण्यास भाग पाडले आहे. आगामी निवडणुकांतील यशाची ही नांदी म्हणावी लागेल, असेही आमदार खडसे यांनी बोलून दाखविले. या वेळी अॅड. रोहिणीताई खडसे, काँग्रेसचे नेते डॉ. जगदीश पाटील, जिल्हा सरचिटणीस संजय पाटील, नितीन कांडेलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर प्रास्ताविक लोकनियुक्त सरपंच डॉ. बी. सी. महाजन म्हणाले की,जनतेने आम्हाला जे भरभरून मताधिक्य दिले जो विश्वास दाखविला त्याला कधीही तडा जाऊ देणार नाही.
तर काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस संजय पाटील यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, गाव व परिसराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून गावाच्या विकासासाठी ग्रामव्हिजन राबविण्यात येईल. याप्रसंगी व्यासपीठावर ईश्वर रहाणे, निवृत्ती पाटील, सुनील नेवे ,विलास धायडे, शिवा पाटील , प्रवीण कांडेलकर, राजकुमार खंडेलवाल, पवनराजे पाटील, राजेश ढोल आदींसह नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते. मयूर साठे यांनी सूत्रसंचालन केले.
हेही वाचा: Jalgaon News : घामाचे पैसे द्या, अन्यथा कारखान्याना बंदच