Sharad Pawar News : शरद पवार अमळनेरला म्हशी खरेदीसाठी आले..!

Sharad Pawar
Sharad Pawar esakal

Jalgaon News : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार हे महाराष्ट्राचा कोपरा न कोपरा फिरले आहेत. अमळनेर येथे तब्बल चौदा वर्षानंतर आले असता, त्यांना आपण एके काळी अमळनेर बाजारात प्रसिद्ध जाफराबादी म्हशी खरेदी करण्यासाठी जावा मोटारसायकलवर आल्याची आठवण झाली.

श्री. पवार यांचा राज्याचा दौरा गेल्या अनेक वर्षांपासून बहुतांश मोटारीने, रेल्वेने असतो. त्यामुळे जनतेशी संपर्क होतो, असे त्यांचे म्हणणे आहे. अमळनेर येथे राष्ट्रवादी ग्रंथालय संघाच्या अधिवेशनास ते उपस्थित राहिले. (Sharad Pawar to Amalner Buffalo came for shopping Reminisce on a tour after fourteen years Jalgaon News)

आताही ते जळगाव दौऱ्यावर रेल्वेने आले आणि अमळनेर येथे मोटारीने गेले. तेथून रात्री मुंबईलाही रेल्वेनेच रवाना झाले. महाराष्ट्रातील प्रत्येक गावाशी त्यांचा संपर्क आहे. त्या-त्या ठिकाणी गेल्यानंतर ते त्या गावाशी, तसेच त्या जिल्ह्याशी जुन्या आठवणींत अगदी रममान होतात.

जळगाव दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा करताना त्यांनी काही जुन्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, कि जळगावशी आपले स्नेहसंबध जुने आहेत. कॉंग्रेसचे काम करीत असताना सभासद नोंदणीसाठी आपण जळगाव जिल्ह्यात आलो होतो.

त्यावेळी पाच रूपयांची पावती फाडून सभासद केले जात असे. बोदवड येथे गेल्यानंतर त्या ठिकाणी रात्री आपण जिनींग प्रेसमध्ये झोपल्याची आठवणही त्यांनी सांगितली. चार दिवस आपण जिल्ह्यात होतो. त्यावेळी चारही दिवस भरीत- भाकरीचा आस्वाद घेतला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sharad Pawar
Jalgaon News : विवाहितेने दिला अविकसित सयामी जुळ्यांना जन्म ; GMC मध्ये महिलेला मिळाला शस्त्रक्रियेद्वारे दिलासा

या ठिकाणचे लोक प्रेमळ असल्याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला. जिल्ह्यातील नेते के. एम. बापू पाटील, प्रल्हादराव पाटील, मु. ग. पवार, के. डी. आबा पाटील, ब्रिजलालभाऊ पाटील, शरदअण्णा पाटील, ओंकारअप्पा वाघ यांच्यासोबतच्या आठवणीही त्यांनी सांगितल्या.

‘पुलोद’ च्या काळात या नेत्यांनी आपल्याला साथ दिल्याचेही त्यांनी नमुद केले. त्याच वेळी आमदार अनिल पाटील यांनी अमळनेर येथे आपण म्हशी खरेदी करण्यासाठी आल्याची माहिती मिळाल्याचे सांगितले.

त्याला होकार देत ते म्हणाले, अमळनेर येथे बाजारात जाफराबादी म्हशी घेण्यासाठी जावा मोटासायकलवर आलो होतो. पक्षाचे जुने कार्यकर्ते सुपडू भादू पाटील यांची आठवणही त्यांनी सांगितली. त्यावेळी रविंद्रभैय्या पाटील यांनी ते सामनेर येथील शेतकी संघाचे बरीच वर्षे अध्यक्ष राहिल्याचे सांगितले. या आठवणींच्या चर्चेची माहीती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील यांनी दिली. जळगाव ते अमळनेर प्रवासात त्यांच्या समवेत आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार अनिल भाईदास पाटील उपस्थित होते.

Sharad Pawar
Nashik BJP News : दंगलींच्या माध्यमातून सत्ता गेलेल्यांची तडफड : केशव उपाध्ये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com