CM In Pachora : मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ 9 सप्टेंबरला पाचोऱ्यात

Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar
Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawaresakal

CM In Pachora : राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यातील तालुकास्तरीय पहिला कार्यक्रम येत्या ९ सप्टेंबरला पाचोरा येथे होत असून, मुख्यमंत्री, दोघे उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्व मंत्रिमंडळ उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘शिवालय’ या आपल्या संपर्क कार्यालयात आमदार किशोर पाटील यांनी गुरुवारी (ता. ३१) दुपारी पत्रकार परिषद घेतली. जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समिती सभापती गणेश पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (shasan aplya dari Cabinet along with Chief Minister in Pachora on September 9 jalgaon news)

आमदार किशोर पाटील यांनी सांगितले, की गेल्या २६ ऑगस्टला पाचोरा व भडगाव तालुक्यांतील लाभार्थ्यांसाठी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम घेण्यात आला होता. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जपान दौरा व आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त ठाणे येथे होणाऱ्या कार्यक्रमांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या व्यस्ततेमुळे कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता.

आता येत्या ९ सप्टेंबरला एम. एम. महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर जिल्ह्यातील तालुकास्तरीय पहिला ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पाचोरा येथे होत असून, त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांच्यासह सर्वच मंत्री उपस्थित राहणार आहेत. पाचोरा व भडगाव तालुक्यांतील २५ हजार लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार असल्याने पाचोरा व भडगाव तालुक्यांतील लाभार्थ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar
Eknath Shinde News: फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता; फोन टॅपिंग प्रकरणावर CM शिंदेंचे वक्तव्य

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नगरदेवळा (ता. पाचोरा) शिवारात मंजूर असलेली शासकीय औद्योगिक वसाहत, काकणबर्डी परिसराचे सुशोभीकरण, क्रीडासंकुल, भडगाव रोड भागातील महाराणा प्रताप चौक ते रेल्वे पुलापर्यंत राष्ट्रीय महामार्गाला लागून मंजूर असलेला जॉगिंग ट्रॅक व ऑक्सिजन पार्कचे ऑनलाइन भूमिपूजन मंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

यासाठीच्या तयारीला वेग आला असून, शासकीय अधिकाऱ्यांसह शिवसेनेचे पदाधिकारी तयारीच्या कामाला लागले आहेत. पाचोरा व भडगाव तालुक्यांतील लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले. तसेच पावसाने दडी मारल्याने खरिपाचे मोठे नुकसान झाले असून, पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे पाचोरा व भडगाव तालुक्यांसह जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली. गणेश पाटील यांनी आभार मानले.

Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar
CM Eknath Shinde : जेव्हा एकनाथ शिंदेंनी विधानसभेच्या गच्चीवरून उडी मारण्याची दिली होती धमकी..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com