CM Eknath Shinde : जेव्हा एकनाथ शिंदेंनी विधानसभेच्या गच्चीवरून उडी मारण्याची दिली होती धमकी..

CM Eknath Shinde :अजून आपण किती नागरिकांचे जीव जाताना उघड्या डोळ्यांनी बघणार आहोत?
CM Eknath Shinde suicide vidhansabha mmbai thane claster
CM Eknath Shinde suicide vidhansabha mmbai thane claster sakal
Updated on

CM Eknath Shinde : अप्पर वर्धा धरणासाठी 1972 साठी तत्कालीन सरकारने जमिनी हस्तांतरित करून घेतल्या होत्या, यावेळी त्या जमीनदारांना चांगला मोबदला देण्याचे सरकारने सांगितले होते. स्थानिकांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र यातली कोणतेही आश्वासन त्यानंतरच्या आलेल्या सरकारांकडून पाळले गेले नाहीत. यामुळे त्या स्थानीक नागरीकांनी आणी शेतकऱ्यांनी बुधवारी म्हणजेच 29 ऑगस्ट ला मंत्रालयातील जाळींवर उड्या मारत आंदोलन केले.

यावेळी खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मंत्रालयात उपस्थित होते. संबंधित आंदोलकांना पोलिसांनी त्याठिकाणहुन बाहेर काढले. मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी मारलेल्या उड्यांची चांगलीच चर्चा झाली. मात्र अशीच एक उडी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधानसभेच्या गच्चीवरून मारून आत्महत्या करणार होते हा किस्सा तुम्हाला माहिती आहे का?

CM Eknath Shinde suicide vidhansabha mmbai thane claster
Eknath Shinde News : CM शिंदेंचा पुन्हा ठाकरेंना धक्का! राऊतांच्या निकटवर्तीय माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश

हा किस्सा तेव्हाचा आहे जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच आमदार झाले होते. सर्वसामान्य नागरिकांसोबत त्यांची नाळ ही सुरुवातीपासून जोडली असल्यामुळे आणि शाखाप्रमुख ते आमदार असा त्यांचा प्रवास झाल्यामुळे त्यांना सर्वसामान्य नागरिकांचे नक्की प्रश्न काय आहेत ते त्यावेळीही माहिती होते.

अशावेळी ठाण्यामध्ये एक जीर्ण इमारत कोसळली. यामध्ये काही ठाणेकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या जीर्ण इमारती कोसळण्याच्या घटना ठाण्यात कित्येकदा घडत होत्या. नागरिकांचे जीव जात होते. या विरोधात एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये आवाज उचलला. 'अजून आपण किती नागरिकांचे जीव जाताना उघड्या डोळ्यांनी बघणार आहोत?' असा सवाल त्यांनी यावेळी विधानसभेमध्ये उभं राहून विचारला. मात्र त्यांना पुढे बोलण्याची संधी तत्कालीन अध्यक्षांनी दिली नाही.

CM Eknath Shinde suicide vidhansabha mmbai thane claster
Eknath Khadse News: रोहित पवार यांची 2 पासून संवाद यात्रा : एकनाथ खडसे

अखेर त्यांनी आपली भूमिका मांडली, 'जर नागरिकांची हेरसाण होत असेल आणी काहीच र्निणय होणार नसेल तर मी विधानसभेच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या करेन असा थेट इशारा यावेळी शिंदेंनी दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली तेव्हाची भूमिका ही प्रचंड गाजली. मात्र काम होणार कसं असा प्रश्न कित्येकांना पडला. कारण इमारती एकमेकांना बाजू बाजूला चिकटून होत्या अशा वेळेस ठाण्यामध्ये क्लस्टर बांधण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली.

CM Eknath Shinde suicide vidhansabha mmbai thane claster
Eknath Khadse News : दुष्काळ तोंडावर... कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा : एकनाथ खडसे

एकनाथ शिंदे निवडणुका आल्या कि कलस्टारचं नाव घेतात असा आरोप त्यांच्यावर झाला. मात्र ते मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी ठाण्यातील क्लस्टरचा मार्ग मोकळा केला. आता तिथे कामाला देखील सुरुवात झाली आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांचे ठाण्यामध्ये चांगलंच कौतुक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे.

(ही माहीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात क्लस्टरच्या कार्यक्रमात बोलतांना ठाण्यात दिली होती )

असं जरी असलं तरी जनतेची जाण असलेला आमदार विधानसभेतून उडी मारून आत्महत्या करेन अशी धमकी देतो आणि जेव्हा तो मुख्यमंत्री होतो तेव्हाच जनतेला मंत्रालयामध्ये येऊन उड्या माराव्या लागतात ही एक दुर्दैवाची बाब आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःला सीएम म्हणजेच कॉमन मॅन म्हणूवून घेतात. अशा वेळी पेटलेला प्राणी प्रश्न लवकरच ते सोडवतील आणि त्या नागरिकांना न्याय देतील अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com