Jalgaon Silver Rates : ‘बजेट’नंतर चांदीच्या दरात 5 हजारांची घसरण! सोन्याचे दर मात्र टिकून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

silver rate

Jalgaon Silver Rates : ‘बजेट’नंतर चांदीच्या दरात 5 हजारांची घसरण! सोन्याचे दर मात्र टिकून

जळगाव : केंद्रीय अंदाजपत्रकानंतर दुसऱ्या दिवशी सोने, चांदीच्या दरात वाढ होऊन सोने बाजारात उसळी आली होती. चांदीच्या दरात प्रतितोळ्यामागे ८०० रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल तीन हजारांची वाढ झाली होती.

आता सोने, चांदीचे दर वाढतच जातील, असे चित्र होते. मात्र, अंदाजपत्रकानंतर दहा दिवसांनंतर सोन्याचे दर तसेच राहिले. मात्र, चांदीच्या दरात तब्बल पाच हजारांची घसरण झाली आहे. (Silver Rates after Budget After union Budget 2023 price of silver dropped by 5 thousand Gold prices sustained jalgaon news)

सोने, चांदीमध्ये केलेली गुंतवणूक लागलीच रोकड देणारी मानली जाते. सोने, चांदी मोड दिली, की मिळालेल्या पैशांतून नागरिक आपली आर्थिक गरज पूर्ण करतात. यामुळे सोन्यात दर वर्षी गुंतवणूक वाढत आहे.

नवीन वर्षात सोने, चांदी बाजारात तेजीचे वातावरण आहे. गेल्या पंधरवड्यापूर्वी सोन्याच्या दरात एक हजार ५०० रुपयांची, तर चांदीच्या दरात एक हजारांची वाढ झाली होती. तेव्हा सोन्याचा दर ‘जीएसटी’सह ५८ हजार ८०० वर पोचला होता.

चांदीचा दर ‘जीएसटी’सह ७२ हजार १०० वर पोचला होता. गेल्या महिन्यात सोन्याचा दर ‘जीएसटी’सह ५९ हजार १२२ रुपये, तर चांदीचा दर ७१ हजारांपर्यंत खाली आला.

शहरासह ग्रामीण भागातील महिलांचा कल सोने खरेदीकडे वाढत आहे. अधिकतर ग्रामीण भागातील महिलांचा सोने खरेदीकडे अधिक कल असतो तो गुंतवणूक म्हणून. शहरी भागातील महिलाही गुंतवणूक आणि फॅशन म्हणून सोन्याकडे पाहतात. भारतातील एकूण सोन्याची वार्षिक मागणी १,१०० ते १,२०० टन आहे. त्यापैकी ५५ ते ६० टक्के खप ग्रामीण भागात होतो.

बजेटपूर्वी सोने ७४ हजार ४०० रुपये (विनाजीएसटी) प्रतितोळा होते. बजेटनंतर ते ५८ हजार २०० रुपये झाले. नंतर त्यात १,२०० रुपयांची घसरण होऊन ५७ हजारांवर आले. रविवारी (ता. १२) पुन्हा ५७ हजार ४०० पर्यंत सोने पोचले आहे.

बजेटनंतर चांदीच्या दरात तीन हजारांची वाढ होऊन चांदी ७२ हजार रुपये प्रतिकिलो होती. नंतर तीन हजारांची घसरण होत ६९ हजार झाली. आता आणखी दरात घसरण होत ६७ हजारांवर आली आहे. दहा दिवसांत पाच हजारांची घसरण चांदीत झाली आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

गेल्या काही दिवसातील सोने, चांदीचे दर असे (विनाजीएसटी)

तारीख -- सोने प्रतितोळे -- चांदी प्रतिकिलो

२८ जानेवारी -- ५७ हजार ४०० -- ६९ हजार

१ फेब्रुवारी -- ५७ हजार ४०० -- ६९ हजार

२ फेब्रुवारी -- ५८ हजार २०० -- ७२ हजार

४ फेब्रुवारी -- ५७ हजार -- ६९ हजार

१२ फेब्रुवारी -- ५७ हजार ४०० -- ६७ हजार