Nandurbar News : मद्यधुंद तरूणांच्या दुचाकीच्या धडकेत पती- पत्नी मृत्यमुखी

accidental bike
accidental bikeesakal

चिंचपाडा (जि. नंदुरबार) : खांडबारा येथून दुचाकीने बाजार करून मोठे कडवान येथे परतणाऱ्या शेतकरी दांम्प्त्यांच्या दुचाकीला मद्यधुंद तिघा तरूणांच्या पल्सने मागून जोरदार धडक दिल्याने पती-पत्नी गंभीर जखमी झाले, उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

दरम्यान त्यांच्या निधनाने मोठे कडवान गावावर शोककळा पसरली असून आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (Husband and wife killed in two wheeler collision of drunken youth bike Nandurbar News)

विसरवाडी खांडबारा रस्त्यावरील खातगाव फाट्याजवळ हा अपघात झाला. मोठे कडवान येथील शेतकरी राजेश सखाराम गावित (४५) हे पत्नी इंदिरा गावितसह (४०) दुचाकीने (एमएच ३९ एएच ८५६५) खांडबारा येथून बाजार करून आपल्या शेतातील घराकडे जात होते.

त्याचवेळी खातगाव येथील तिघे तरूण किरण किसन वळवी (१८), अमोल वळवी (२५), सूरज गावित (२२) हे प्लसर दुचाकीने (जीजे ०६ एमओ ९१५२) मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने मागून येत होते. प्रत्यक्षदर्शींनी ते भेलकांडत दुचाकी चालवित असल्याचे व मद्याच्या नशेत असल्याचे सांगितले.

त्यांनी राजेश गावित यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने राजेश व इंदिरा गावित रस्त्याच्या कडेला फेकले गेले. १०८ रुग्णवाहिकेवरील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले, मात्र उपचार सुरू असातना त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

accidental bike
Jalgaon Crime News : 2 वर्षे फरारी असलेल्या संशयिताला अटक; शेतकरी लुटीचे गुन्हे उघडकीस

धडक देणारे तिघे तरूण दुचाकीवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनाही पुढील उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविले आहे.

मृताच्या नातेवाइकांनी आक्रोश केला होता, आज त्यांच्यावर राहत्या गावी मोठे कडवान येथे अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे आई, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

पल्सरवरील तरुणांनी शेतकरी पती-पत्नीला अपघातात जखमी करून ठार केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईक व मोठे कडवान ग्रामस्थांनी केली आहे. पोलिस चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करूत असून त्यानंतर गुन्हा नोंदविला जाणार असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

accidental bike
Pune Crime News : सासूने सोन्याचे दागिने घालू दिले नाहीत; चिडलेल्या सुनेने दिली सुपारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com