Latest Marathi News | Social Development Project : गावाप्रमाणे शहरातही होऊ शकते Biogas Modelयशस्‍वी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Biogas Project

Social Development Project : गावाप्रमाणे शहरातही होऊ शकते Biogas Modelयशस्‍वी

जळगाव : ग्रामीण भागात जनावरांच्‍या मलमूत्राद्वारे बायोगॅस मॉडेल उभारणी करणे सहज शक्‍य आहे. त्‍यानुसारच शहरी भागातदेखील हे मॉडेल अगदी सहज यशस्‍वी होऊ शकते. त्यासाठी नवीन बांधकाम करताना सेफ्टी टँक बनविण्याऐवजी बायोगॅस करावा.

याद्वारेदेखील परिवाराचा स्‍वयंपाक होऊन इंधन खर्च वाचेल, असा विश्‍वास सिंधुदुर्ग येथील भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांनी ‘सकाळ’शी संवाद साधताना व्‍यक्‍त केला.

जळगावात विद्यापीठातील कार्यक्रमानिमित्त डॉ. देवधर आले असता त्‍यांच्‍याशी संवाद साधला. डॉ. देवधर यांनी सांगितले, की बायोगॅस घराघरांत उभारणे गरजेचे आहे. यातून नक्‍कीच इंधन बचत होईल. गरिबांसाठी बायोगॅस प्रकल्‍प उभारायचा असेल तर भगीरथ प्रतिष्‍ठानकडून सहा हजार रुपये देत असतो.

यातूनच सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात बायोगॅस हे ग्रामविकासाचे मॉडेल उभारत आहे. याकरिता केवळ चार लोक काम करीत असून, दोनशे स्‍वयंसेवकांची मदत मिळतेय.(Social Development Project Biogas Model Successful in city also Jalgaon news)

हेही वाचा: Jalgaon : कंपनीत कामावर जाणाऱ्या तरुणाला मारहाण करत लुटले

Dr.Prasad

Dr.Prasad

नऊ हजार कुटुंबे करतात

बायोगॅसवर स्‍वयंपाक

सिंधुदुर्ग जिल्‍हा धूरमुक्‍त करण्याचे स्‍वप्‍न असल्‍याचे सांगताना डॉ. देवधर यांनी सांगितले, की सिंधुदुर्गमध्‍ये त्‍या दृष्‍टीने मागील १५ वर्षांपासून काम सुरू आहे. झाराप गावातून याची सुरवात होऊन आतापर्यंत जिल्‍ह्यातील ७४० गावे व ४७० ग्रामपंचायतींमध्‍ये बायोगॅस प्रकल्‍प उभारले आहेत. या माध्‍यमातून नऊ हजार कुटुंबे बायोगॅसवर स्‍वयंपाक करीत आहेत. हे काम प्रत्‍येक गावात व्‍हायला हवे. जळगाव जिल्‍ह्यातदेखील एखादे गाव धूरमुक्‍त करण्याचा मानस त्‍यांनी बोलून दाखविला.

शहरातही व्‍हावेत बायोगॅस

ग्रामीण भागात चार सदस्‍यांचे कुटुंब असल्‍यास एक गाय असल्‍यास त्‍याद्वारे कुटुंबाचा संपूर्ण स्‍वयंपाक सहज होऊ शकतो. याकरिता एकदाच २५ हजारांचा खर्च केल्‍यास २५ वर्षे ते चालणार आहे. याउलट शहरी भागात गाय, जनावरांचे पालन शक्‍य नसले तरी घराचे बांधकाम करताना सेफ्टी टँकऐवजी बायोगॅस प्रकल्‍प उभारावा. याकरिता शिळे अन्‍न, विष्‍ठा याचा वापर होऊ शकतो. विशेष म्‍हणजे सेफ्टी टँकमधून काही वर्षांनी दुर्गंधी येते; तीदेखील बायोगॅसमुळे येणार नाही. याकरिता साधारण ३५ ते ४० हजारांचा खर्च होऊ शकतो.

गावाचे बाह्यरूप बदलणे धोकादायक

आज गावांमध्‍ये पथदीपांचा झगमगाट पाहावयास मिळतो. असे करणे म्‍हणजे गावाचे शहरीकरण होत आहे. यातून गावाचा विकास होऊ शकत नाही. मुळात गावाचे बाह्यरूप बदलणे धोकादायक असल्‍याचे डॉ. देवधर यांनी सांगितले. गावात संपत्ती निर्माण व्‍हायला हवी. यासाठी प्रत्‍येक गावामध्‍ये गायी-गुरांची संख्‍या वाढायला हवी. मुळात गावाचे बाह्यरूप बदलणे धोकादायक असल्‍याचे डॉ. देवधर यांनी सांगितले. गावात संपत्ती निर्माण व्‍हायला हवी. यासाठी प्रत्‍येक गावामध्‍ये गायी-गुरांची संख्‍या वाढायला हवी. मुख्‍य म्‍हणजे गावातील गोधन वाढेल तेव्‍हाच गाव समृद्ध होईल, असे मतदेखील डॉ. देवधर यांनी व्यक्‍त केले.

हेही वाचा: Crime News : पतीशी भांडणानंतर घर सोडलेल्या पीडितेवर बिहारमध्ये अत्याचार

टॅग्स :JalgaoncityBiogas Project