
अंतयात्रा याच्यापुढे तब्बल सत्तर फुटांचा तिरंगा धरलेले तरुण व त्यामागे अंतयात्रा लावणारे दृश्य पाहताना उपस्थितांना अक्षरशा गहिवरून आले
चाळीसगाव : शहीद जवान अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणांच्या निनादात जवान सागर धनगर यांच्या पार्थिवावर आज सकाळी दहा वाजेला त्यांच्या मूळ गावी तांबोळे ता. चाळीसगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.जवानांना शेवटचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आवश्य वाचा- प्रवासात वृध्दाची अचानक प्रकृती बिघडली; मग काय, एसटी बस थेट ग्रामीण रुग्णालयात नेली
तांबोळे बुद्रुक येथील सागर रामा धनगर (वय 23) या जवानाचा मणिपूर येथे गोळी लागून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली होती. आज सकाळी आठला त्यांच्या मूळगावी तांबोळे येथे जवानाचे पार्थीव आणण्यात आले. त्यानंतर गावातून फुलांनी सजलेल्या सैन्यदलाच्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. वंदे मातरम, जवान अमर रहे, अमर रहे, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
या वीर जवानाला शासकीय इतमामात गावापासून जवळच असलेल्या तांबोळे टेकडी येथे मोकळ्या जागेवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान सागर धनगर यांच्या चुलत भाऊ देवेंद्र धनगर याने भावाच्या पार्थिवाला अग्नी दिला. यावेळी तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण, भैय्यासाहेब पाटील, तहसीलदार अमोल मोरे, ग्रामीण चे पोलीस निरीक्षक श्री ठेंगे, सैन्य दलातील मराठा बटालियन चे सुभेदार संपत आमले, हवालदार रोहिदास पाटील व खानदेश रक्षक ग्रुप चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. अग्निडाग देण्यापूर्वी जवान सागर धनगर यांना सैन्यदल व पोलिसांतर्फे हवेत बंदुकीच्या गोळ्या झाडून मानवंदना देण्यात आली.
आवर्जून वाचा- हतनूर जलाशयात जैवविविधतेचा अभ्यास; ३०९ प्रजातींची नोंद
तिरंग्याच्या रॅलीद्वारे अखेरचा प्रवास
जवान सागर धनगर यांची अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्ययात्रेस सुरुवात झाली. अंतयात्रा याच्यापुढे तब्बल सत्तर फुटांचा तिरंगा धरलेले तरुण व त्यामागे अंतयात्रा लावणारे दृश्य पाहताना उपस्थितांना अक्षरशा गहिवरून आले.
मन सुन्न करणारा कुटुंबाचा आक्रोश
पहाटेपासूनच तांबोळे येथे गर्दी जमू लागली होती. गावात पार्थिव दाखल झालेे आणि कुटुंबासह गावकरी व उपस्थितांच्या अश्रूंचा बांधा फुटला.
संपादन- भूषण श्रीखंडे