जळगावच्या सुपुत्राला पठाणकोटमध्ये देशसेवा बजावताना वीरमरण

jalgaon soldier
jalgaon soldieresakal

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सावखेडा बु. (ता.पाचोरा) येथील सुपुत्र जवान मंगलसिंग जयसिंग परदेशी (वय ३५) हे यांना पाक सीमेवर पठाणकोट येथे देशसेवा बजावत असताना वीरमरण प्राप्त झालं. त्यांच्या निधनाची बातमी आल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

रविवारी (ता.१४) सकाळी दीडच्या सुमारास देशसेवेचे कर्तव्य बजावताना त्यांना गोळी लागली. त्यानंतर त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांना वीरमरण आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वीर जवान मंगलसिंग परदेशी हे सैन्य दलात ईएमई मध्ये नायक पदावर कार्यरत होते. वयाच्या अठराव्या वर्षीच ते सैन्य दलात भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन मोठे भाऊ, पत्नी आणि तीन अपत्य असा परिवार आहे.

jalgaon soldier
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरे यांची भेट! राजकीय चर्चांना उधाण

सुपुत्राला साश्रूनयनांनी अखेरचा निरोप

वयाच्या 18 व्या वर्षीच ते सैन्य दलात भरती झाले होते. पाचोरा तालुक्यात सावखेडा परिसरात जिल्हा परिषद शाळेत इयत्ता दहावीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं. मंगलसिंग यांना लहानपणापासून देश सेवेची आवड होती. मंगल सिंग यांच्या पश्चात आई वडील दोन मोठे भाऊ पत्नी आणि तीन अपत्य असा परिवार आहे. 16 नोव्हेंबर रोजी पाचोरा तालुक्यातील सावरखेडा इथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच मंगलसिंग परदेशी यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.

jalgaon soldier
समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम, BMC ने उच्च न्यायालयात दिली माहिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com