समीर वानखडे जन्मापासून मुस्लिम? कोर्टात सादर केली कागदपत्र | Sameer wankhede | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sameer Wankhede

समीर वानखडे जन्मापासून मुस्लिम? कोर्टात सादर केली कागदपत्र

मुंबई: मुंबई NCB चे झोनल संचालक समीर वानखेडे (Sameer wankhede) यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev wankhede) यांनी नवाब मलिक (Nawab malik) यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. नवाब मलिक यांच्याकडून दररोज आरोप होत असल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं आहे. या प्रकरणात हायकोर्टात सुनावणी सुरु आहे.

कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रात समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम असल्याचा उल्लेख असल्याची सूत्रांची माहिती आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याशी संबंधित काही कागदपत्रे कोर्टात सादर केली आहेत. यात मुंबई महापालिकेने दिलेला जन्म दाखला, शाळेचा दाखला यांचा समावेश आहे. त्या कागदपत्रांत समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम असल्याचा उल्लेख असल्याची सूत्रांची माहिती आहे.

हेही वाचा: दुसऱ्या जातीतल्या मुलाबरोबर लग्न केलं म्हणून पित्याने मुलीवर केला बलात्कार

नवाब मलिक यांनी हाय कोर्टमध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. समीर वानखेडे यांच्याबाबतची कागदपत्रेही मलिक यांनी कोर्टात दाखल केली आहेत. वानखेडे यांचे शाळा, महापालिकेशी निगडित कागदपत्रे आणि जन्मदाखला सादर केला आहे. चेंबरमध्ये जाऊन ही कागदपत्रे दाखल केली आहेत. उद्या याबाबत सुनावणी असेल. सर्व आरोप खोटे असून यात काहीही तथ्य नसल्याचं ज्ञानेश्वर वानखडे यानी स्पष्ठ केलं आहे. यावेळी त्यांनी आपण कायदेशीर उत्तर देऊ असे सांगितलं आहे, तसेच 'साम टिव्हीला त्यांच्याशाळेचा दाखला पुरावा म्हणून दिला आहे.

हेही वाचा: VIDEO: जोडप्याचं पॅरासिलिंग सुरु असताना दोरी तुटली अन्...

ज्ञानदेव वानखेडे यांनी कोर्टात सांगितलं की, ते "हिंदू महार आहेत आणि त्याची पत्नी झाईदा ही मुस्लिम होती पण त्यांनी हिंदू पद्धतीनुसार लग्न केलं." लग्नानंतर झाईदा हिंदू धर्मात समाविष्ट झाल्या. ज्ञानदेव वानखेडे यांनी स्वत:च आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळेच्या मार्कलिस्ट, पोलीस सेवेत असतानाचे कागदपत्रांचे इतर पुरावे कोर्टासमोर ठेवले.

loading image
go to top