संजय राऊतांनी घेतली राज ठाकरे यांची भेट! राजकीय चर्चांना उधाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut raj thackeray

संजय राऊतांनी घेतली राज ठाकरे यांची भेट! राजकीय चर्चांना उधाण

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीमुळे पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. या भेटीचे नेमके कारण काय?

राऊत यांनी थेट राज ठाकरे यांचे नवे घर गाठले.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन होता. त्यामुळे संजय राऊत आज शिवतीर्थावर सपत्नीक आले होते. शिवसेना प्रमुखांना अभिवादन केल्यानंतर राऊत यांनी थेट राज ठाकरे यांचे नवे घर गाठले. राऊत यांनी राज यांची भेट घेतली असली तरी या भेटीमुळे पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

हेही वाचा: सौरव गांगुलीला ICC मध्ये मिळाली मोठी जबाबदारी; वाचा सविस्तर

या भेटीने तर्कवितर्कांना उधाण

राऊत यांच्या मुलीचं 29 नोव्हेंबर रोजी लग्न आहे. या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राऊत सपत्नीक राज यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आले होते. यावेळी राज आणि राऊत यांच्यात मनमोकळ्या गप्पा झाल्या. ही कौटुंबीक भेट होती. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगितलं जातं.

हेही वाचा: Malegaon : दंगल पू्र्वनियोजित? रझा अकादमीच्या कार्यालयावर छापे

loading image
go to top