Jalgaon News : सुसाट ट्रकने शेतकऱ्यास चिरडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sopan sable

Jalgaon News : सुसाट ट्रकने शेतकऱ्यास चिरडले

जळगाव : विटनेर (ता. जळगाव) येथे भरधाव आयशरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सोपान विठ्ठल साबळे (वय ४४, रा. विटनेर ता. जि. जळगाव) असे मृत (Death) दुचाकीस्वाराचे नाव आहे. (speeding truck crushes farmer jalgaon news)

सोपान साबळे बुधवारी (ता. २२) शेतात दुचाकीने गेले होते. दुपारी दोनच्या सुमारास शेतातून जळके गावात कामानिमित्त दुचाकीने निघाले असताना, जळके-विटनेर रस्त्यावरील ज्ञानेश्वर पाटील यांच्या शेताजवळ सुसाट वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सोपान साबळे यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह रवाना केला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आयशरचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे तपास करीत आहेत.

टॅग्स :Jalgaonaccident