Jalgaon News: कपाशीवरील ‘लाल्या’वर युरियाच्या फवारण्या करा; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाकूर यांची माहिती

Cotton News
Cotton Newsesakal

Jalgaon News : कापसामध्ये पाने लाल होणे याला लाल्या रोग असे म्हणतात. या रोगावर मात करण्यासाठी योग्य वेळी पेरणी (४० डिग्रीपेक्षा कमी तापमान झाल्यावर), युरियाच्या एक किंवा दोन फवारण्या (१ टक्का), मॅग्रेशियम सल्फेटचा वापर (०.५ टक्के), शेतात पाणी साचू नये म्हणून पुरेसा निचरा ठेवणे, फुले आणि बोंड वाढीदरम्यान पुरेशा पोषक द्रव्यांचा पुरवठा, वेळेवर आंतरमशागत, तण काढणी व पुरेसे सिंचन उपलब्ध करणे जमिनीचे आरोग्य राखण्यासाठी पीक फेरपालट व आंतरपीक लागवड करून व्यवस्थापन करावे.

अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली. (Spray Urea on Lalya on Cotton Information of District Superintendent Agriculture Officer Thakur Jalgaon News)

हा रेाग कपाशीवर आल्याची ओळख पाने लालसर होणे अशी आहे. सुरवातीला परिपक्व पानामध्ये दिसून येते, हळूहळू संपूर्ण पानांमध्ये पसरते. सुरवातीला पानांचे कडा पिवळे पडते. नंतर लाल रंगद्रव्य तयार होते. कालांतराने संपूर्ण पाने कोरडी होतात.

नंतर गळून जातात. याची प्रमुख कारणे म्हणजे, जमिनीत नत्राची कमी उपलब्धता, पाण्याची कमतरता किंवा पाणी साचण्याची परिस्थिती, विकसनशील बोंडाकरिता नत्राची अधिक गरज यामुळे पानांमध्ये नायट्रोजनची पातळी कमी होते (क्रिटिकल मर्यादेच्या खाली) रात्रीच्या तापमानात अचानक बदल किंवा घट (१५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी), मॅग्रेशियमची कमतरता, पानातील हरीतद्रव्याचा नाश आदींमुळे अँथोसायनिन (लाल) पिग्मेटेशन वाढते, असेही श्री. ठाकूर यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Cotton News
Nashik Epidemic Disease: साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त; NMCकडून औषध, धूर फवारणी करण्याची मागणी

दरम्यान, लाल झालेल्या पानांमध्ये नायट्रोजन आणि मॅग्रॅशियमचे प्रमाणे कमी होते. पानांमध्ये नत्र कमी झाल्यामुळे कार्बोहायड्रेट अधिक जमा होतात. परिणामी सी/एन गुणोत्तरात वाढ होते. अँथोसायनिन रंगद्रव्य संचय झाल्याने हा विकार होतो.

पान लालसर होणे कोणात्याही वाढीच्या टप्प्यावर उद्भभवू शकते. परंतु सुरवातीच्या अवस्थेत अधिक नुकसान दिसून येते. पीकावरील रस शोषणाऱ्या किडीमुळे पाने लाल होण्याबद्दल बऱ्याचदा गोंधळ होतो.

पिकाची गरज व उपलब्ध अन्नद्रव्य संबंधांवर परिणाम करणारे घटक पाने लालसर होण्यास प्रोत्साहन देतात. अतिपाऊस किंवा पाऊसाचा खंड पडल्यास अधिक लक्षणे दिसून येतात. त्यानुसार योग्य ते व्यवस्थापन करावे, असेही त्यांनी कळविले आहे.

Cotton News
Nashik: नृत्य कलेसाठी प्रत्येक जिल्ह्यात व्हावे सेंटर! सरकारची विद्यार्थ्यांसाठी नृत्यकला स्पर्धा होण्याची गरज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com