Jalgaon Manudevi Mandir : हेमाडपंथी शैलीतील श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिर; राजा ईश्वरसेन काळात बांधणीचा उल्लेख

Temple idol in Shri Kshetra Manudevi temple in taluka and Attractive waterfall in the temple area
Temple idol in Shri Kshetra Manudevi temple in taluka and Attractive waterfall in the temple areaesakal

Jalgaon Manudevi Mandir : बऱ्हाणपूर - अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोली (ता. यावल) गावापासून उत्तरेला सातपुडा पर्वताच्या रांगेत १२ किलोमीटरवर खानदेशवासीयांचे कुलदैवत मनुदेवी मातेचे हेमाडपंथी मंदिर आहे.

सातपुडा पर्वतरांगांतील घनदाट जंगलात मनुदेवीचे हेमाडपंथी शैलीतील सुरेख मंदिर आहे. राजा ईश्वरसेन राजा या भागात राज्य करीत असताना त्याने मंदिराची बांधणी केल्याचे उल्लेख आढळतात. ईश्वरसेनने देवीच्या मूर्तीची स्थापना मार्केंडय ऋषींच्या हस्ते वैदिक पद्धतीने केली असल्याची आख्यायिका आहे. (Sri Kshetra Manudevi Temple in Hemadpanthi style jalgaon navratri news)

खानदेशवासीयांची कुलदैवत असलेल्या तालुक्यातील आडगाव येथील सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी आगामी नवरात्रोत्सवास रविवारपासून (ता. १५) प्रारंभ झाला आहे. जागृत देवस्थान असलेल्या सातपुडा निवासिनी श्री क्षेत्र मनुदेवीच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह राज्यातील भाविक दर्शनासाठी येतात.

मंदिराचा इतिहास

मंदिराची स्थापना प्राचीन काळापासून करण्यात आली असून, महामार्गावर असलेल्या चिंचोली गावापासून तीन कि.मी.अंतरावर उत्तरेला आडगाव कासारखेडा व तेथून साधारणतः पाच ते सहा कि.मी. अंतरावर सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले मानापुरी या आदिवासी गावापासून मनुदेवीचे मंदिर जवळपास चार ते पाच कि.मी अंतरावर आहे, म्हणजे सहा कि.मी.संपूर्ण सातपुड्याच्या जंगलातूनच प्रवास करावा लागतो.

मनुदेवी मंदिराकडे जाताना वाटेत मारोतीचे छोटे मंदिर आहे. मनुदेवी मातेचे दर्शन घेण्याआधी भाविक प्रथम येथूनच माथा टेकवून पुढे ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌प्रवास करतात. मनुदेवी मातेचे हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिराचा सभामंडपही ८६ बाय ५० फूट आकाराचा आहे तर गाभारा २२ बाय १४ फूट इतका भव्य आहे.

मंदिराभोवती तेरा फूट उंचीच्या व दोन किलोमीटर लांबीच्या भिंतीच्या विटा वैशिष्ट्य़पूर्ण आहेत. बुरुजांचे काही भाग ढासळलेले आहेत. तरी सध्या अस्तित्वात असलेल्या अवशेषांवरून पूर्वीच्या बांधकामाची रचना अथवा मजबुतीविषयी अंदाज करता येतो.

Temple idol in Shri Kshetra Manudevi temple in taluka and Attractive waterfall in the temple area
Saptashrungi Devi Gad : आदिमायेस सफेद महावस्राची बांधली पूजा; सप्तशृंगगडावर भाविकांची अलोट गर्दी

नयनरम्य धबधबा

मंदिर परिसरात पोचल्यावर जवळपास शंभर सव्वाशे पायऱ्या चढून मंदिरात जावे लागते. मंदिराच्या समोरच सुमारे १०० फूट उंचावरून नयनरम्य असा धबधबा कोसळतो. या धबधब्यावरून कोसळणारे शुभ्र पाणी व मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत भाविकांचे अंगावर पडणारे तुषार भाविकांची विशेष लक्षवेधी सातपुड्याच्या कुशीत श्री मनुदेवीचे वास्तव्य असल्याने सुमारे तीन किलोमीटर घनदाट जंगल नागमोडी वळणाचा रस्ता आणि सात वेळा ओलांडावी लागणारी नदी पर्यटकांचे लक्ष वेधून घेते.

बसची विशेष सुविधा

नवरात्रोत्सवाचे सुरुवातीचे चार दिवस खासगी वाहनाने थेट मंदिरापर्यंत जाता येते. तर १९ ऑक्टोबर पंचमीपासून खासगी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येणार असून, भाविकांची वाढती गर्दी पाहता ऐनवेळी मानापुरीजवळ मंदिराचे अलीकडे सुमारे चार किलोमीटर अंतरावर सातपुडा पर्वताच्या कुशीत भल्या मोठा पटांगणावर उभारलेल्या वाहनतळावर वाहने पार्किंग करून तेथून पुढील चार किलोमीटर पार्किंगच्या जागेपासून पुढील प्रवास बसनेच करावा लागणार आहे. यात्रोत्सव काळात भाविकांसाठी जळगाव, भुसावळ बस स्थानकावरून एसटी आगारातून जादा बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

यात्रोत्सत्रात लाखो भाविकांकडून दर्शन

प्रत्येक वर्षाच्या चैत्र व माघ शुद्ध अष्टमी या दिवशी येथे नवचंडी महायज्ञाचे आयोजन केले जाते. संपूर्ण मार्गशीर्ष महिना व श्रावण महिन्यातील पिठोरी अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी यात्रा असते. आश्विन महिन्यात नवरात्रोत्सव व देवीची यात्रा असते. नवरात्रोत्सवानिमित्त दहा दिवस लाखो भाविक व पर्यटक या ठिकाणी हजेरी लावतात. नवरात्रोत्सवात खणा नारळाची व खेळ खेळण्याची तसेच फराळाची मोठी दुकाने या ठिकाणी लावली जातात.

Temple idol in Shri Kshetra Manudevi temple in taluka and Attractive waterfall in the temple area
Navratri Festival : काळा कोट, कायद्यावर बोट..! महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना 'या' नवदुर्गा ठोठावताहेत शिक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com