
ST महामंडळाच्या लिपीकाचा गळा दाबुन लूटमार
जळगाव : ड्युटीवरुन मध्यरात्री घरी जात असताना समोरून येणाऱ्या दोघांनी एकाचा गळा दाबून त्याला लुटल्याची घटना शिवाजीनगरातील ख्रिश्चन स्मशानभूमीजवळ घडली. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शिवाजीनगर परिसरातील वज्रेश्वरी मंदिराजवळ वाल्मीक मोरे (वय ४३) वास्तव्यास आहे. ते एटी महामंडळात लिपिक पदावर नोकरीस असून मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घरी पायी जात होते. यावेळी ख्रिश्चन स्मशानभूमीजवळून जात असताना त्यांच्या समोर दोन व्यक्ती आले.
हेही वाचा: तरुणीकडे मोबाईल नंबर मागितल्याने दोन गटात हाणामारी
त्यांच्यातील एकाने मोरे यांचा गळा दाबून धरला तर दुसऱ्याने मागून हात घट्ट पकडून ठेवले. यावेळी त्यातील एकाने मोरे यांच्या खिशातील दहा हजार रुपयांचा मोबाईल व पाचशे रुपये रोख असे काढून घेत पसार झाले. याप्रकरणी रविवारी (ता. ५) वाल्मीक मोरे यांनी शहर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: 20 किलोचा घण चालवतो, एकाच घावात संपवला...मारेकऱ्याची कबुली
Web Title: St Corporation Clerk Robbed By Two People In Shivaji Nagar Jalgaon
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..