Jalgaon News : कागदाच्या एका तुकड्यासाठी कोळी समाजाची भटकंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SC ST Cast

Jalgaon News : कागदाच्या एका तुकड्यासाठी कोळी समाजाची भटकंती

चोपडा : तालुका विधानसभा मतदारसंघ हा २००९ पासून अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव करण्यात आलेला आहे. या मतदारसंघात आदिवासीबहुल मतदारसंख्या कोळी समाजाची आहे. मात्र, अजूनही कोळी समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले मिळत नाहीत.

वर्षानुवर्षापासून कोळी समाजाला शासनदरबारी भटकंती करावी लागत आहे. याकडे संबंधित विभागाचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत आहे.

कागदाच्या एका तुकड्यासाठी कोळी समाजाची शासनदरबारी भटकंती करावी लागत असून यासाठी लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास अमळनेर उपविभागीय प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर आदिवासी टोकरे कोळी जमातीतर्फे तीव्र अन्नत्याग सत्याग्रह करु, असा इशारा महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्क प्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांनी दिला आहे.

तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये कोळी समाजाची ग्रामपंचायतीच्या कुटुंब पत्रकात अनुसूचित जमाती अशी नोंद आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या शाळा सोडण्याच्या दाखल्यावरही टोकरे कोळी अशी नोंद आहे. ज्यांच्या सातबारा उताऱ्यावर आदिवासीची ३६ व ३६ अ ची नोंद आहे, ज्या गावात आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत ठक्कर बाप्पा योजना व शबरी घरकुल योजना राबवली आहे, ज्यांची दाखल्यासाठीची जुनी प्रकरणे प्रलंबित आहेत.

जे नवीन प्रकरणे दाखल करतील अशा सर्व लोकांना टोकरे कोळीचा (एसटी) दाखला मिळाला पाहिजे असे सांगून याबाबतचे निवेदन आम्ही संबंधित विभागासह शासन दरबारी पाठविणार असल्याचेही श्री. बाविस्कर यांनी सांगितले.

टॅग्स :JalgaonSTcaste