Jalgaon Crime News : बनावट पोटॅश खताचा साठा सापडला; 96 हजारांचा मुद्देमाल जप्त

crime
crimeesakal

Jalgaon Crime News : हातेड खुर्द (ता. चोपडा) येथील शेतकरी किशोर आत्माराम पाटील यांनी पोटॅश खत बनावट असल्याबाबत कृषी विभागाकडे तक्रार केली होती.

या तक्रारीवरून कृषी सहाय्यक विलास मोरे यांनी तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांच्याशी संपर्क साधून पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे व धुळे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक मनोज शिसोदे यांच्या संयुक्त पथकाने सापळा रचत बनावट पोटॅश खताच्या ९६ हजार ९०० रुपयांच्या एकूण ५७ बॅग मुद्देमाल जप्त केल्याने धुळे व जळगाव जिल्ह्यात बनावट खताचीही विक्री होत असल्याने उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. (Stock of fake potash fertilizer found 96000 items seized Jalgaon Crime News)

जिल्हा गुण नियत्रण निरीक्षक अरुण तायडे यांनी गुरुवारी (ता. २७) सकाळी दहाला भ्रमणध्वनीवर दिलेल्या संदेशनुसार मौजे हातेड खुर्द (ता. चोपडा) येथील शेतकरी किशोर आत्माराम पाटील (वय ४५) यांनी कृषी विभागाकडे पोटॅश या खताच्या गुणवत्तेविषयी तक्रार केली होती.

तालुका कृषी अधिकारी दीपक सांळुखे व अरुण तायडे यांनी या शेतकऱ्याकडे जाऊन पोटॅश या खताची बॅगची व त्यामधील खताची तपासणी केली असता त्यांना या खताबाबत बनावट असल्याचे प्रथमदर्शनी आढळले.

त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यास विचारले असता त्यांनी सांगितले, की मंगलचंद झुंबरलाल जैन (मु.पो. तोंदे, ता. शिरपूर) यांनी त्यांना या खताच्या ७ बॅग १ हजार ७०० रुपये दराने आणून दिल्या होत्या. या खताची पावती अथवा बिल दिले नव्हते.

शेतकऱ्याला विश्वासात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी खताच्या पिशव्या परत करण्यास सांगितल्या. या सर्व प्रकारावरून कृषी अधिकारी यांनी सुरजमल मोहनलाल जैन यांच्या दुकानाच्या गोदामात छापा मारला असता त्या ठिकाणी म्युरीट ऑफ पोटॅश (एमओपी) या आयपीएल कंपनीच्या बनावट प्रति बॅग ५० किलो वजनाची खताच्या ५७ बॅग आढळून आल्यात.

या गोदाम मालकास विचारले असता त्याने सांगितले, की हा खत साठा कैलास वासुदेव पाटील (रा. तोंदे) यांनी माझ्या घरात कापूस भरलेला असून, खते ठेवण्यासाठी जागा नाही. काही दिवस खत राहू द्या, अशी विनंती केल्याने मी ती खते ठेवली आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

crime
Pune Crime: पुणे हादरलं! नशा करणाऱ्यांना हटकल्याने कोयत्याने वार करत एकाची हत्या

असा लेखी कबुली जबाब सुरजमल जैन यांनी दिला. त्यावरून कैलास वासुदेव पाटील यांनी सदरचे बनावट खत विक्रीसाठी आणले. कैलास पाटील यांना सुरजमल जैन यांच्या भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता हे खत किशोर शालिकराव पाटील (रा. करवंद) यांनी बिगर बिलाचे दिले असल्याचे सांगितले.

यानुसार बनावट खताच्या ५७ बॅग प्रति बॅग ५० किलो वजनाची, प्रति बॅग किमंत १ हजार ७०० प्रमाणे मुद्देमाल ९६ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन करण्यात आला.

तोंदे गावात साठवणूक केलेले खत हे हातेड खुर्द (ता.चोपडा) येथील शेतकरी किशोर पाटील यांना देऊन फसवणूक केली.म्हणून मंगलचंद झुबंरलाल जैन (रा. तोंदे, ता. शिरपूर), कैलास वासुदेव पाटील (रा. तोंदे), किशोर शालिकराव पाटील (रा. करवंद, ता. शिरपूर) या आरोपींनी संगनमताने नकली खत शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणल्याने शेतकऱ्याची व शासनाची फसवणूक केल्याने धुळे जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक मनोज शिसोदे यांच्या फिर्यादी वरून थाळनेर (ता. शिरपूर) या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime
पतीने केले दुसरे लग्न; खात्री करण्यास गेलेल्या विवाहितेस मारहाण करत विनयभंग | Crime News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com