Jalgaon Crime : भांडण सोडविणाऱ्यांच्या डोक्यातच हाणला दगड | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Jalgaon Crime : भांडण सोडविणाऱ्यांच्या डोक्यातच हाणला दगड

जळगाव : किरकोळ वादावरून समजविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केल्याची घटना एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोर घडली. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला. (Stone hit head of person during quarrel Jalgaon Crime Latest Marathi News)

हेही वाचा: NMC आयुक्तांकडून मिरवणूक मार्गावर 5 किलोमीटरची रपेट

शहरातील शिरसोली रोडवरील डीमार्टसमोर सईद शहा सलीम शहा आपल्या परिवारासह राहतो. सोमवारी (ता. ५) सकाळी अतराला सईद शहा एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोर किरकोळ वाद सोडविण्यासाठी गेला असता त्याला खलील शहा गुलाब शहा, आसिफ शहा लतिफ शहा, अरबाज शहा लतिफ शहा आणि समीर शहा खलील शहा (सर्व रा. फुकटपुरा, जळगाव) या चौघांनी सईदला शिवीगाळ व बेदम मारहाण करून जखमी केले. या संदर्भात सोमवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिस नाईक जितेंद्र राजपूत तपास करीत आहेत.

हेही वाचा: Nashik : अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे हत्याकांड प्रकरणी तिघांना जन्मठेप

Web Title: Stone Hit Head Of Person During Quarrel Jalgaon Crime Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaoncrime jalgaon news