Jalgaon News : बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांची पायपीट; विद्यार्थी नदी, नाले ओलांडून गाठतात शाळा

एस. एस. पाटील विद्यालयात जाण्यासाठी नदी, नाले, शेतातून पायवाट तुडवत प्रवास करावा लागत आहे.
Students going to school from Shet Shiwar as there is no bus on time to come to school.
Students going to school from Shet Shiwar as there is no bus on time to come to school. esakal

Jalgaon News : येथील आगाराने खडके (ता. अमळनेर) गावात येणाऱ्या बसची वेळ बदलल्याने खडकेसह निसर्डी व वाघोदा येथील विद्यार्थ्यांना लोंढवे (ता. अमळनेर) येथील स्वर्गीय आबासाहेब एस. एस. पाटील विद्यालयात जाण्यासाठी नदी, नाले, शेतातून पायवाट तुडवत प्रवास करावा लागत आहे.

लोंढवे येथील शाळा सुटलल्यानंतर बस वेळेवर नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेतून घरी जाताना अंधार होत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (students are going home from by walk due to bus is not on time after school in jalgaon news)

या प्रकारामुळे अनेक विद्यार्थी शाळा सोडून देण्याच्या मनःस्थितीत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अमळनेर आगारातून सुटणाऱ्या खडके बसमध्ये खडकेसह निसर्डी, वाघोदा येथील विद्यार्थी, विद्यार्थिनी लोंढवे येथे विद्यालयात शिक्षणासाठी यायची. सकाळी आणि सायंकाळी बसची सुविधा असल्याने त्यांना वेळेत शाळेत आणि घरी पोहचता येत होते. परंतु आगाराने अचानक सकाळी अकरा व सायंकाळी पाचची बस बंद केली.

आता एक बस दुपारी बारा व सायंकाळी सातला असते. जी विद्यार्थ्यांच्या सोयीची नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना या बसचा काहीही उपयोग होत नाही. परिणामी, विद्यार्थ्यांची सध्या प्रचंड गैरसोय होत आहे. ज्यांना शाळेची आवड आहे, असे मुले व मुली अक्षरशः शेतातून काट्याकुट्यातून, नदी, नाल्यातून रस्ता तुडवत शाळेत येत आहेत. सायंकाळी पाचला शाळा सुटल्यानंतर बस नसल्याने त्यांना अंधारातूनच वाट काढत घरी पोहचावे लागत आहे.

Students going to school from Shet Shiwar as there is no bus on time to come to school.
Jalgaon News: जळगाव महापालिकेतर्फे 151 किलो नायलॉन मांजा जप्त

आगार प्रमुखांचे दुर्लक्ष

विद्यार्थ्यांच्या या समस्येसंदर्भात काही पालकांनी अमळनेर येथे येऊ आगार प्रमुखांची भेट घेऊन त्यांना समस्या सांगितली. मात्र, त्यांनी कुठलाही सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. आगाराने ही बस का बंद केली याचे कारणही अद्यापपर्यंत आगाराने स्पष्ट केलेले नाही.

सध्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने त्याला जबाबदार कोण राहणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दररोज सकाळी अकरा व सायंकाळी पाच वाजता बस सोडावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांकडून करण्यात येत आहे.

''अमळनेर आगाराने खडके बस बंद करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसोय केली आहे. शाळेकडून आगाराला पत्र देऊन बस पुन्हा सुरू करण्यासाठी विनंती केली जाईल. त्यावरही आगाराने दखल न घेतल्यास वरिष्ठांकडे दाद मागू.''- बाळासाहेब पाटील, मुख्याध्यापक ः लोंढवे विद्यालय

Students going to school from Shet Shiwar as there is no bus on time to come to school.
Jalgaon Municipality News : जळगावात रस्ते सफाईसाठी लवकरच इलेक्ट्रीक झाडू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com