
सोशल मीडियावर विद्यार्थिनीचे बनावट खाते
जळगाव : तरुणीचा फोटो वापरून इन्स्टाग्राम आणि फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफार्मवर बनावट खाते तयार करण्यात आले. तसेच संबंधित तरुणीच्या ओळखीतील लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तरुणीला बदनाम करण्याचा कट उघडकीस आला असून सायबर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे.
सायबर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथील २६ वर्षीय तरुणी शिक्षण घेत आहे. या तरुणीचे संशयिताने परस्पर इंस्टाग्राम तसेच फेसबुकवर बनावट खाते तयार केले. या बनावट खात्यांवर तरुणीचा फोटो अपलोड करुन तिच्याशी संबंधित व्यक्तीना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत बदनामीचा कट रचण्यात आला होता. एप्रिल महिन्यात घडलेल्या प्रकाराबाबत वेळीच संबंधित तरुणीच्या निदर्षनास आणून दिल्याने घडलेल्या या प्रकाराविरुद्ध तरुणीने मंगळवारी (ता. ३१) जळगाव सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तरुणीच्या तक्रारीवरून बनावट खाते तयार करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहेत.
हेही वाचा: खंडणीसाठी चहा-नाश्ता विक्रेत्यावर चाकू हल्ला; गावगुंडांवर गुन्हा दाखल
हेही वाचा: Jalgaon : जुन्या भांडणाचा राग अनावर; तरुणाच्या डोक्यात हाणली आसारी
Web Title: Students Fake Account On Social Media
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..