Gang Fight
Gang Fightesakal

Jalgaon : जुन्या भांडणाचा राग अनावर; तरुणाच्या डोक्यात हाणली आसारी

आसारी डोक्यात मारल्याने तरुणाला गंभीर दुखापत

जळगाव : शिरसोली (ता. जळगाव) येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला लोखंडी आसारी डोक्यात मारून गंभीर दुखापत केल्याची घटना देवकर महाविद्यालयाच्या मागे रस्त्यावर घडली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील योगेश पाटील (वय ३५) हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. मंगळवारी (ता. ३१) रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास योगेश पाटील हा दुचाकीने देवकर महाविद्यालयाच्या मागे असलेल्या शिरसोली रस्त्यावरून जात होता. त्यावेळी रवींद्र लक्ष्‍मण बुंदे (रा. शिरसोली) व त्याच्यासोबत इतर अनोळखी तीन जण यांनी योगेश पाटील यांची दुचाकी अडवली. मागील भांडणाच्या कारणावरून रवींद्र बुंदे हातातील लोखंडी आसारी योगेश पाटील यांच्या डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली व सोबत असलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी पायावर लोखंडी पाईपने मारहाण केली. योगेशला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. योगेश पाटील यांनी त्यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात रवींद्र लक्ष्‍मण बुंदे (रा. शिरसोली ता. जळगाव) यांच्यासह अन्य तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक जितेंद्र राठोड करीत आहे.

Gang Fight
तोंडापूर परिसरात कर्जबाजारी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
Gang Fight
Jalgaon : दुचाकीचा धक्का लागल्याने चाकूने वार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com