Latest Marathi News | केळी लागवडीसाठी ‘रोहयो’ अंतर्गत 10 प्रवर्गातील शेतकऱ्यांना अनुदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Grants

Jalgaon News : केळी लागवडीसाठी ‘रोहयो’ अंतर्गत 10 प्रवर्गातील शेतकऱ्यांना अनुदान

जळगाव : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत केळी पिकाच्या समावेशाबाबत शासनाने (निर्णय क्रमांक फळबाग २०२२/ प्र.क्र.३५/मग्रारो-५/मंत्रालय मुंबई १५ डिसेंबर अन्वये) केळी (३ वर्षे) पीक नव्याने समाविष्ट केले आहे. या योजनेत दहा संवर्गातील शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे.

त्यात केळी पिकाचे लागवड अंतर १.८४१.५० मीटर असावे लागेल. प्रथम वर्ष अनुदान प्रतिहेक्टर रक्कम एक लाख ७३ हजार ८४, दुसऱ्या वर्षासाठी ४३ हजार ७४८, तिसऱ्या वर्षासाठी ३६ हजार २००, असे एकूण दोन लाख ५३ हजर ३२ रुपये तीन वर्षांसाठी देय राहील. (Subsidy to farmers in 10 categories under banana cultivation Jalgaon News)

हेही वाचा: Nashik News : 4 उपनद्यांसह 67 नाल्यांना पुनर्वैभव! मुंबई IITचा मिठी नदीच्या धर्तीवर प्रकल्प

प्रवर्ग असे : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, निरधी सूचित जमाती (विमुक्त जमाती), दारिद्र्यरेषेखालील कुंटुब, स्त्री कुटुंबप्रमुख असलेले कुटुंब, दिव्यांग व्यक्ती कुटुंबप्रमुख असलेले कुटुंब, जमीन सुधारणाचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेखालील लाभार्थी, अनुसूचित जमातीचे व इतर पारंपरिक वनवासी (वन हक्क्म मान्य करणे) अधिनियम २००६ (२००७-२) खालील पात्र लाभार्थी.

उपरोक्त प्रवर्गामधील १ ते १० पात्र लाभार्थीना प्राधान्य देण्यात आल्यानंतर कृषी कर्जमाफी योजना २००८ या मध्ये व्याख्या केलेले अल्पभूधारक (५ एकरपर्यंत) सीमांत भूधारक (२.५ एकरापर्यंत) यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. क्षेत्र मर्यादा या योजनेतंर्गत कमीत कमी ०.०५ हेक्टर क्षेत्र व जास्तीत जास्त २०० हेक्टर क्षेत्र मर्यादा आहे.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: Jalgaon News : 12 बाजार समित्यांच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा

मजूर कार्ड (जॉब कार्ड), ग्रामपंचायतीने मान्य केलेली लाभार्थी यादीत नाव असणे आवश्यक, प्रपत्र ‘अ’ अर्जाचा नमुना प्रपत्र व संमतीपत्र (फळबागेचे कार्य ग्रामपंचायत किंवा कृषी विभागापैकी कोणाकडून राबविण्यात रस आहे, याचा स्पष्ट उल्लेख लाभार्थ्याने करावा.), लागवड करावयाच्या जागेचा ७/१२ उतारा, ८ ‘अ’ खाते उतारा ही कागदपत्रे लागतील. योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकरे यांनी कळविले आहे.

हेही वाचा: Crime News : खोट्या अनुभवपत्रामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात