Jalgaon News : जिल्ह्यात खाकीचे कोम्बिंग ऑपरेशन; बेशिस्त वाहनचालकांना दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sudden combing operation was carried out by district police force jalgaon news

Jalgaon News : जिल्ह्यात खाकीचे कोम्बिंग ऑपरेशन; बेशिस्त वाहनचालकांना दंड

जळगाव : जिल्‍हा पोलिस दलातर्फे अचानक कोम्बिंग ऑपरेशन (combing operation) राबविण्यात आले.

जिल्‍ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करून वाहन तपासणीसह रेकॉर्डवरील संशयितांची तपासणी करण्यात आली. (sudden combing operation was carried out by district police force jalgaon news)

१५५ सराईत गुन्हेगारांची तपासणी, तसेच आठशे वाहनचालकांकडून ५८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

पोलिस अधीक्षक एम. जयकुमार यांच्या सूचनेवरून अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, अंमलदारांसह आरसीपी प्लॉटून सोबत घेऊन नाकाबंदी केली.

हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

रस्त्यावरील वाहने तपासणीसह, हॉटेल्स, लॉज, रेल्वेस्थानक, बसस्थानक आदी ठिकाणी तपासणी करण्यात आली. १०३ हॉटेल, लॉजेस, ढाब्यांची तपासणी करण्यात आली. ३१ संशयितांना वॉरंट बजावण्यात आले.

वाळू चोरी करणाऱ्या एकाला ताब्यात घेण्यात आले. दोन तडीपार संशयितांना अटक, चोरीच्या उद्देशातील दोघांना अटक व मुंबई पोलिस ॲक्ट अंतर्गत ४ जणांवर कारवाई करण्यात आली.