
Jalgaon News : अंधश्रद्धेपोटी मुक्या जिवांचा छळ; घोड्यांच्या नालसाठी खुरांची चाळणी
जळगाव : शहरात दोन काळे घोडे गेल्या तीन ते चार दिवसांपासून वेगवेगळ्या भागात दिसून येत होते. या घोड्यांसोबत दोन व्यक्ती होते.
हे घोडे रपेट मारण्यासाठी नाही, तर घोड्याची नाल विक्री करण्यासाठी फिरविले जात आहेत, अशी माहिती जिल्हा प्राणी क्लेश कायदा समितीचे सदस्य रवींद्र फालक यांना मिळाली होती.
एक नाल दिवस भर कसा विकत असणार, हा प्रश्न वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक यांना पडला. त्यांनी तत्काळ धाव घेत त्या घोडेवाल्यास शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निघून गेला होता. त्या भागात विचारपूस करून माहिती घेतली असता, धक्कादायक खुलासा झाला. (Superstition case do injured hoof for horse shoes Jalgaon News)
हेही वाचा: Nashik Crime News : अन्नदानाच्या बहाण्याने मंडप डेकोरेटरला गंडविले! भांडी घेऊन संशयित पसार
संबंधित व्यक्तीकडे २० ते २५ नाल असतात. काळ्या घोड्याच्या नालबाबत अनेक अंधश्रद्धा असल्याने अंधश्रद्धाळू नागरिक याच्या शोधातच असतात. काळा घोडा पाहताच नागरिक विचारणा करतात. दीडशे ते अडीचशे रुपयांत एक नाल विकत घेतात. यासाठी घोडामालक दिवसभर तो घोड्याला नाला ठोकत बसतो. ग्राहक आल्यावर काढत असतो.
त्यामुळे घोड्याच्या खुरांना अनेक छिद्रे आहेत. त्यांचा पाय थोडा लंगडतो आहे. हे दोन जण आहेत. एक आरटीओ ऑफिसजवळ, एक स्वातंत्र्य चौकात फिरत असतात, असे नागरिकांनी सांगितले. या घटनेचे काही फोटो आणि व्हिडिओ वन्यजीव संरक्षण संस्थेला मिळाले. त्यावरून वन्यजीव संरक्षण संस्थेचे रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे, योगेश गालफाडे, राजेश सोनवणे, जगदीश बैरागी, मयूर वाघुळदे, नीलेश ढाके, वासुदेव वाढे यांनी संबंधित व्यक्तींचा शोध घेतला असता, ते मिळून आले नाहीत.
हेही वाचा: Crime News : वाळू माफियावर कारवाई; ६५ लाखांचा साठा जप्त
या प्रकारे कुणीही प्राण्यांचा छळ करीत असेल, तर नागरिकांनी पुढाकार घेऊन त्या व्यक्तींना समज द्यावी, प्राण्यांचा छळ थांबवावा, तसेच प्रशासनाने या प्रकारचे अमानवीय कृत्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. प्राण्यांचा छळ करणे प्राणी क्लेश कायद्यांतर्गत गुन्हा असून, कठोर शिक्षेची तरतूद आहे. संबंधित व्यक्तीला शोधून नेमका प्रकार काय आहे, ते समजावे लागेल.
दरम्यान, वन्यजीव संरक्षण संस्थेचे बाळकृष्ण देवरे, सचिव योगेश गालफाडे, राजेश सोनवणे, जगदीश बैरागी, पंकज सूर्यवंशी, मयूर वाघुळदे, मुकेश सोनार, नीलेश ढाके, रवींद्र फालक यांनी शुक्रवारी (ता. ३०) शोध घेतला असता, संबंधित व्यक्ती ४०० रुपयांत नाल विकताना आढळून आला. आधी शहानिशा करून मग जिल्हापेठ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येऊन एका व्यक्तीला ताब्यात घेतले.
हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक
हेही वाचा: Nashik Crime News : अन्नदानाच्या बहाण्याने मंडप डेकोरेटरला गंडविले! भांडी घेऊन संशयित पसार
संबंधित घोडेवाले दिल्ली येथील रहिवासी असून, ते जळगाव शहरात चार घोड्यांसह दाखल झाले आहेत. मुहंमद जावेद, जावेद शेख, शाकीर अली व अन्य एक व्यक्ती आहे. या व्यक्तींकडून दररोज ८ ते १० कस्टमरला नाल विक्री केली जाते. त्यानुसार एका घोड्याला महिन्याला किमान ३०० वेळा नाल काढली आणि ठोकली जाते, ही क्रूरता आहे. त्यामुळे घोड्यांच्या पायाला इजा होत आहे. या व्यक्तींना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संबंधित व्यक्तींना पोलिस प्रशासनाने जिल्हा सोडून जाण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार शुक्रवारी सकाळी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी घोडेवाल्यांच्या डेऱ्यावर जाऊन घोड्यांना दाणापाणी देऊन त्यांच्या मालकांना यापुढे असे कृत्य करू नका, अशी समज देऊन रवानगी केली.
"आता संबंधित घोडेमालकांवर पोलिस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई केली असून, वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे महाराष्ट्रभरातील प्राणीमित्रांशी संपर्क साधून संबंधित व्यक्तींबद्दल माहिती दिली आहे. महाराष्ट्रात कुठेही नाल विक्री करताना आढळून आल्यास गुन्हे दाखल केले जाणार आहेत."
-बाळकृष्ण देवरे, संस्थापक, वन्यजीव संरक्षण संस्था
हेही वाचा: Dhule News : भरवस्तीतील अवैध गॅसपंपावर छापा