Jalgaon Crime : मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयित ताब्यात | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rape news

Jalgaon Crime : मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयित ताब्यात

पाचोरा (जि. जळगाव) : तालुक्यात ग्रामीण भागातील एका गावात तरुणाने गावातील २३ वर्षीय मतिमंद मुलीच्या घरात घुसून जबरदस्तीने शारीरिक संबध करून गर्भवती केले व ही बाब कुणास सांगितली ठार करण्याची धमकीही दिली. मात्र पीडित मतिमंद तरूणीला डाॅक्टरांकडे उपचारासाठी घेऊन गेल्यावर सर्व प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी धाव घेऊन त्या तरुणाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Suspect arrested in case of torture of mentally retarded girl Jalgaon Crime Latest Marathi News)

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सुधाकर वाघ यांनी पोलिसात धाव घेत उपविभागिय पोलिस अधिकारी भारत काकडे यांची भेट घेतली. घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पुन्हा तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पाचोरा पोलिसांनी संशयित ज्योतीलाल पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी पीडित तरुणीच्या शेजारी राहणाऱ्या नातेवाईक आहेत व पीडित तरूणी व तिची वृध्द आई मतिमंद आहे. संशयित ज्योतीलाल पाटील (वय २५) हा नेहमी त्यांच्या घरी येत जात होता.

गेल्या चार ते पाच महिन्यांपासून सदर तरूणाचे रात्री बेरात्री येउन पीडिताची आई झोपलेली असल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचाराचा नित्यक्रम सुरू केला होता. महिनाभरापूर्वी पीडित तरुणीच्या शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांनी संशयित ज्योतीराम पाटील यास दुष्कृत्य करताना पकडले होते.

हेही वाचा: Dhule Crime : चोरीचा उलगडा; पोलिसांकडून दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत

पोळ्याच्या दरम्यान पीडित तरूणी व तिची आई आजारी होती तसेच शेजारील नातेवाईक महिलाही आजारी होती. त्यांना गिरड येथे सरकारी दवाखान्यात तपासणीसाठी घेऊन गेले असता डॉक्टरांनी पीडित तरूणी व तिच्या आईचीही वैद्यकीय तपासणी केली. त्यावेळी डॉक्टरांनी मुलगी गर्भवती आहे, असे सांगितले.

त्यानंतर घरी आल्यावर आपल्या घरात ज्योतीराम कधी आला होता का, किती वेळेस आला होता, असे पीडित तरूणीस विचारले असता तिने हाताने ४ ते ५ वेळेस आला होता, असे सांगितले. तिने सांगितलेल्या घटनेवरुन पीडितेच्या आईसह नातेवाईकांनी पाचोरा पोलिसात धाव घेत ज्योतिलाल पाटील याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

हेही वाचा: बेपत्ता मुलाचा 24 तासात शोध; देवळा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

Web Title: Suspect Arrested In Case Of Torture Of Mentally Retarded Girl Jalgaon Crime Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..