Dhule Crime : चोरीचा उलगडा; पोलिसांकडून दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत

crime news
crime newsesakal

धुळे : शहरातील स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील चोरीची उकल करण्यास पोलिसांना यश आले. याप्रकरणी तीन चोरटे व चोरीचा माल घेणाऱ्या दोन भंगार विक्रेत्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत झाला.(theft solved police seized one half lakh dhule crime news)

औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात २६ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान चोरी झाली. चोरट्यांनी इमारतीच्या छताच्या पत्र्यालगत खालील बाजूस मोकळ्या जागेतून प्रवेश करत इलेक्ट्रीक मोटारी, पिलर टाइप ड्रील, असे दोन लाख ४३ हजार ५०० रुपयांचे २६ नग लंपास केले.

crime news
Nashik Crime : येवल्यात भरचौकात मेडिकल दुकान फोडले; 57 हजारांवर डल्ला

याप्रकरणी मुख्याध्यापक प्रशांत पाटील यांच्या फिर्यादीनुसार दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याचा तपास संतोष लोले करीत असताना अन्य एका गुन्ह्यात अटकेतील संशयित नुऱ्या ऊर्फ नूर निसार पिंजारी, शाहरुख रेहमान शहा, विशाल अमृत कदम (सर्व रा. दोंडाईचा) यांनी प्रशिक्षण केंद्रातील गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना हस्तांतर वॉरंटने ८ सप्टेंबरला अटक करण्यात आली.

पोलिस कोठडीत चौकशीदरम्यान अटकेतील संशयितांनी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील चोरी त्यांचे फरार साथीदार असरार सलीम शेख व शाहरुख फारुख शहा (रा. गौसियानगर, दोंडाईचा) यांच्यासह केल्याची कबुली दिली. तसेच चोरीचा माल शहरातील भंगार विक्रेते अय्युब हाजीमुनीर पिंजारी, भुऱ्या ऊर्फ एजाज नबी पिंजारी व राहील शकील पिंजारी (रा. गौसियानगर) यांना विक्री केल्याचे सांगितले.

crime news
Dhule Crime : म्हसदीतील 2 दुकानांमध्ये चोरी; लाखोचा ऐवज लंपास

त्यामुळे अय्युब पिंजारी व भुऱ्या पिंजारी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, दोघांनी पाचही चोरट्यांकडून चोरीचा माल विकत घेऊन त्याची विल्हेवाट लावली म्हणून दोघांना अटक करून पोलिस कोठडी घेण्यात आली. निष्पन्न तपासावरून गुन्ह्यात वाढीव कलमे लावण्यात आली.

तपासादरम्यान अटकेतील नुऱ्या पिंजारी याच्याकडून चोरलेल्या मालापैकी ए. सी. क्युरल केज इलेक्ट्रिक मोटार, युनिव्हर्सल इलेक्ट्रिक मोटार व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा (एमएच १८ ई ८०२८), कार (एमएच १८ टी १९३६), असा एक लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अटकेतील संशयित नुऱ्‍या पिंजारी (वय २२), शाहरुख शहा (२२), अय्युब पिंजारी, भुऱ्या पिंजारी (३५) व विशाल कदम यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश आहेर, दोंडाईचा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक संतोष लोले, उपनिरीक्षक सचिन गायकवाड, शरद लेंडे, हवालदार प्रवीण निंबाळे, विश्वेश हजारे, हिरालाल सूर्यवंशी, प्रवीण धनगर यांच्या संयुक्त पथकाने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com