Jalgaon Crime News : 2 वर्षे फरारी असलेल्या संशयिताला अटक; शेतकरी लुटीचे गुन्हे उघडकीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shahrukh Tadavi

Jalgaon Crime News : 2 वर्षे फरारी असलेल्या संशयिताला अटक; शेतकरी लुटीचे गुन्हे उघडकीस

जळगाव : शेतकऱ्यांची लूट प्रकरणी दाखल गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरारी असलेल्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (ता. १२) अटक केली. पुढील कारवाईसाठी संशयित शाहरुख तडवी याला भडगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. (Suspect on run for 2 years arrested Crimes of looting of farmers exposed Jalgaon Crime News)

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

शेतकऱ्यांची लूट प्रकरणात भडगाव पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरारी असलेला संशयित शाहरुख रज्जाक तडवी याला अटक करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिल्या होत्या.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याच्या शोधार्थ असताना, संशयित पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) येथे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली.

त्यांच्या पथकातील लक्ष्मण पाटील, रणजित जाधव, किशोर राठोड, श्रीकृष्ण देशमुख यांनी संशयित शाहरुख रज्जाक तडवी (वय २५, रा. कोल्हे, ता. पाचोरा) याला पिंपळगाव हरेश्वर येथून रविवारी अटक केली. संशयिताला पुढील कारवाईसाठी भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.