Jalgaon Crime News : बळकावलेले घर खाली करण्यासाठी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी समज दिल्यानंतर संशयितांनी महिलेसह तिच्या पतीला मारहाण करून महिलेचा विनयभंग केला. (suspects beat woman husband and molested woman jalgaon crime news)
पीडित गृहिणीने पतीच्या उपचारासाठी २०१८ मध्ये समाधान खंडू सोनवणे याच्याकडून ८० हजार उसनवारीने घेतले. कोरोना काळात पैसे देता आले नाहीत.
पैसे देण्याची परिस्थिती नाही, याची जाणीव झाल्यावर घर बळकावण्याच्या उद्देशाने समाधान सोनवणे यांनी पीडितेचे भाडेकरूला पिटाळून लावले व घरावर कब्जा मिळवला.
हा वाद पोलिस ठाण्यात पोचले. रविवारी (ता. ११) रामानंदनगर पोलिस वादस्थळी पोचले व त्यांनी हे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असून, आपसांत वाद-भांडणे न करता न्यायालयात दाद मागावी, असा समज दिली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पोलिस गेल्यावर दांगडो
पोलिसांना बोलावले याचा राग मनात ठेवून समाधान सोनवणे, त्याचा शालक सिद्धार्थ व समाधानची पत्नी आणि मुलाने पीडित महिलेसह तिच्या आजारी पतीला बेदम मारहाण केली.
पतीला वाचवित असताना, समाधान सोनवणे याने पीडितेचा विनयभंग केला. याबाबत रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, सहाय्यक फौजदार उषा सोनवणे तपास करीत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.