
Jalgaon : 44 अंश तापमानाने लाहीलाही
जळगाव : विदर्भात सलग पाच दिवस उष्णतेची लाटेचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असला, तरी जळगाव जिल्ह्यात उन्हाचे तीव्र (raising Temperaure) चटके जाणवू लागले आहेत. याचाच परिणाम म्हणून की सोमवार (ता. ९)चे तापमान ४४ अंश नोंदविण्यात आले. आणखी पुढील काही दिवस उष्णतेचे राहणार असल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होताना दिसत आहे. (temperature raised to 44 degrees in jalgaon Temperature news)
सकाळी दहापासूनच उन्हाचे तीव्र चटके जाणविण्यास सुरवात होते. सोमवारी सकाळी अकरानंतर तर उन्हाच्या झळा कार्यालयात बसल्यावरही येत होत्या. कडक उन्हामुळे दुपारनंतर अनेक भागातील रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र होते. कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांनी डोक्यावर रूमाल, टोपी बांधल्याचे दिसून आले. उन्हापासून सुटका मिळण्यासाठी ताक, लस्सी, शीतपेय, उसाचा रस यांना प्रचंड मागणी वाढली आहे.
हेही वाचा: जळगाव : माहेरवाशिणीचा हुंड्यासाठी छ्ळ; गुन्हा दाखल
महामार्गावरही शुकशुकाट
शहरातून जाणाऱ्या महामार्गावर दुपारी एकनंतर शुकशुकाट दिसून आला. अनेक वाहनधारक झाडाखाली वाहने लावून उन्हापासून बचाव करताना दिसत होते. बाजारपेठांमध्येही दुपारी ग्राहकांअभावी दुकानदार ग्राहकांच्या प्रतिक्षेत होते. सायंकाळी सहानंतर मात्र शहरातील बाजारपेठांतील गर्दी वाढली होती.
हेही वाचा: Jalgaon : लोक अदालतीत 41 लाखांची वसुली
Web Title: Temperature Raised To 44 Degrees In Jalgaon Temperature News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..