Jalgaon News : वाळू मिळण्यासाठी निविदा प्रक्रिया मंगळवारपासून; जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू

sand
sandesakal

Jalgaon News : नवीन वाळू धोरणानुसार जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना मे महिन्यापासून ६०० रुपये दराने ब्रास वाळू उपलब्ध होईल.

त्यासाठी रेती डेपो तयार करणे जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे. जिल्ह्यातील वाळू गटांच्या निविदेची प्रक्रिया २ मेपासून सुरू आहे. दहा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल. नागरिकांना १५ मेनंतर वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. (Tender process to get sand from Tuesday Preparations of district administration have started Jalgaon News)

जिल्हा प्रशासनाने वाळू संनियंत्रण समितीची बैठक नुकतीच घेतली. त्यात वाळू लिलाव व इतर बाबींचे धोरण ठरविले आहे. वाळू गटांच्या लिलावाची प्रकिया २ मेपासून सुरू होणार आहे. प्रत्येक तालुक्यात वाळू डेपो तयार करण्यात येणार आहे.

जून २०२२ पासून जिल्ह्यात वाळू उपसा बंद आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने विविध ठिकाणच्या नद्यांमध्ये वाळूचा मोठा साठा झाला आहे. राज्यस्तरीय पर्यावरण समितीने वाळू गटांच्या लिलावाला मंजुरी दिली आहे.

सोबतच राज्य शासनाने वाळू सर्वसामान्यांना परवडेल, अशा दरात देण्याचे धोरण निश्चित केल्याने वाळू लिलावाची प्रक्रिया सहा महिन्यांपासून रखडली होती. आता राज्य शासनानेच वाळूचे दर सहाशे रुपये ब्रास जाहीर केले आहेत.

प्रत्येक तालुक्यात वाळू डेपो कंत्राटदाराला देण्यात येईल. कंत्राटदार वाळू गटांपासून, तर वाळू डेपोपर्यंत वाळू काढून आणेल. नागरिकांकडून वाळूची मागणी होईल, तेव्हा तो त्यानेच प्रमाणित केलेल्या डंपर, ट्रॅक्टरमधून वाळू पाठविली जाईल.

जो खर्च त्याला येईल, त्यातून वाळूचा दर सहाशे रुपयांप्रमाणे नागरिकांकडून घेतला जाईल. खर्चाची उर्वरित रक्कम संबंधित कंत्राटदाराला शासन देणार आहे. शासकीय कामासाठी वाळू राखीव ठेवण्यासाठी काही गट आरक्षित करण्यात येणार आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

sand
Dhule Bazar Samiti Election Result : शिरपूरला अमरिशभाईंचाच करिष्मा! सर्व 18 जागांवर विजय

‘जीपीएस’ प्रणालीची अंमलबजावणी होणार का?

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी १ मेपासून गौण खनिज वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना ‘जीपीएस’ प्रणाली आवश्‍यक केली आहे. वाळू डेपोतून निघणाऱ्या वाळूच्या वाहनांना जीपीएस प्रणाली असण्याची जबाबदारी डेपो कंत्राटदाराची असेल.

त्यात त्रुटी असतील, तर नियम, अटींनुसार संबंधिताला दंड करण्यात येणार आहे. गौण खनिज वाहणाऱ्या वाहनांना जीपीएस सिस्टीम बसविणे बंधनकारक आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी कितपत होईल, यात शंका उपस्थित केली जात आहे.

या वाळू गटांचे होतील लिलाव

वाळू गटाचे नाव-- उपलब्ध वाळू साठा

*केऱ्हाळे बुद्रुक (ता. रावेर)-- १७६७

*पातोंडी (ता. रावेर)-- १७७६

*दोधे (ता. रावेर)-- २१४७

*धावडे (ता. अमळनेर)-- ६३६०

*बाभूळगाव-१ (ता. धरणगाव)-- २७३५

*बाभूळगाव-२ (ता. धरणगाव)-- ३९३३

*भोकर (ता. जळगाव)-- १२०८५

*तांदळी (ता. अमळनेर)-- ५३२७

sand
Mico Hospital: सातपूर मायको हॉस्पीटलमध्ये कुटूंबनियोजन शस्रक्रिया बंदच! कामगार महिलांची 2 वर्षांपासून गैरसोय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com