Jalgaon News : तलवार घेऊन दहशत माजवणारा अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Criminal Arrested News

Jalgaon News : तलवार घेऊन दहशत माजवणारा अटकेत

जळगाव : शहरातील इच्छादेवी मंदिर परिसरात बेकायदेशीर हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या संशयिताला पोलिसांनी अटक केली.

तांबापुरा पंचशीलनगर इच्छादेवी मंदिर परिसरात बेकायदेशीर एक तरुण हातात तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दीपक जगदाळे यांना मिळाली. (Terror with a sword Arrested Jalgaon Crime News)

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

हेही वाचा: Jalgaon News : सहनशीलतेची टर्रर्र उडवली जातेय... तरीही आपण शांतच!

त्यावरून सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक सुधीर साळवे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी रितेश ऊर्फ तिच्या कृष्णा शिंदे (वय २१, रा. रामेश्वर कॉलनी) याला ताब्यात घेतले व त्याच्याजवळील तलवार जप्त केली.

याबाबत पोलिस नाईक सुधीर साळवे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार अतुल वंजारी तपास करीत आहे.

हेही वाचा: Crime News : घरात नेऊन नऊ वर्षांच्या चिमुरडीवर तरुणांचा सामूहिक बलात्कार; मोबाईलमध्ये शूट केला अश्लील व्हिडिओ