Jalgaon News : हॉटेलमध्ये मद्यपींचा गोंधळ

alcoholic
alcoholicesakal

जळगाव : जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरच बिअर बारमध्ये रात्री पावणेअकराच्या सुमारास मद्यपींनी गोंधळ घातला. पोलिस कर्मचाऱ्यावर हात उगारून हुज्जत घालणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर एक पळून गेला. (The drunkard made a mess in beer bar jalgaon news)

शहरातील नवीन बसस्थानकशेजारी आणि पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरच हॉटेल रिगल पॅलेसमध्ये मद्य पिणाऱ्या चौघांनी समोरील टेबलवर बसलेल्या व्यक्तीवर पाण्याची बॉटल भिरकावल्याने वाद वाढला.

हॉटेल मालकाने तातडीने जिल्‍हापेठ पोलिसांना पाचारण केले. गस्तीवरील पोलिस कर्मचारी गणेश पाटील हॉटेलमध्ये पोचले. कृष्णा पिंगळे, मयंक चौधरी, भावेश चौधरी आणि गोपाळ नवल यांनी पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून जात हात उगारला.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

alcoholic
Jalagon Crime News : भुसावळमधील खूनप्रकरणी फरारी दोघे सुरतमधून ताब्यात

तातडीने अतिरिक्त पोलिस बोलावून हुज्जत घालणाऱ्यांपैकी तिघांना ताब्यात घेतले, तर गोपाळ नवल पळून गेला. याबाबत पोलिस कर्मचारी गणेश पाटील यांच्या तक्रारीवरून जिल्‍हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला. फरारी संशयिताचा शोध सुरू आहे.

alcoholic
Jalgaon News : प्रातर्विधीसाठी गेलेल्या युवकाचा मृतदेह आढळला; सार्वे येथील घटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com