Jalagon Crime News : भुसावळमधील खूनप्रकरणी फरारी दोघे सुरतमधून ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Jalagon Crime News : भुसावळमधील खूनप्रकरणी फरारी दोघे सुरतमधून ताब्यात

भुसावळ (जि. जळगाव) : येथील हिरा हॉलजवळ ४ मार्चला जीम ट्रेनर अफाक अख्तर पटेल याला पूर्ववैमनस्यातून १८ जणांनी रॉड व काठ्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले होते. दरम्यान, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. (2 fugitive criminals arrested in Bhusawal murder case from Surat jalgaon crime news)

या गुन्ह्यातील चौघांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. दरम्यान आज फरार दोघांना सुरत येथून अटक करण्यात आली आहे.

या गुन्ह्यातील चौघे संशयित तेहसीन नासिर शेख, शेख समीर शेख फिरोज शेख मुजम्मील शेख फरीद, लतीफ हबीब तडवी या चौघांना ७ मार्चला अटक करण्यात आली होती. संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

दरम्यान, पथकातील दोन वेगवेगळे पथक तयार करुन शेख उबेद शेख अक्रम (रा. भुसावळ), शेख अबुझर शेख बशीर (भुसावळ) या दोघांना सुरत येथील सालाबादपुरा पोलिस ठाण्याच्या मदतीने ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस कर्मचारी सुनील जोशी, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, जावेद शहा, प्रशांत सोनार यांनी केली.