जानेवारीअखेर ओमिक्रॉन रूग्णांची संख्या ३० हजारांवर जाण्याची शक्यता

आरोग्य यंत्रणेचा अंदाज : कोरोनाचे नियम धाब्यावर बसविल्याने रुग्णवाढ
omicron omicron in india
omicron omicron in indiaSakal
Updated on: 

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट(jalgaon corona update) ‘ओमिक्रॉन’च्या(omicron) रूपात सुरू झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. ही वाढ अशीच राहिली तर जानेवारीअखेरपर्यंत रुग्णसंख्या ३० हजारांवर जाण्याची भीती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण व जिल्हा आरोग्य विभागाने(jalgaon district health department) वर्तविली आहे. कोरोना संसर्गाचा प्रोटोकॉल कोणीच पाळत नसल्याने दिवसेंदिवस वाढ होत असल्याचा दावाही आरोग्य विभागाने केला आहे.

तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सर्व तालुक्यातील कोविड केअर सेंटर अद्ययावत करून ठेवण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला जिल्हा प्रशासनाने दिले आहे. सोबत ऑक्सिजन प्लांटच्या अपूर्ण राहिलेल्या जोडण्यास, ऑक्सिजन पाइपलाइनच्या जोडण्या पूर्ण करण्याचे सांगितली आहे. त्यादृष्टीने सर्वच ग्रामीण रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात, जिल्हा उपकेंद्रातील यंत्रणा कामे कशी पूर्ण होतील, यासाठी धावपळ करताना दिसत आहे.

जिल्ह्यात तिसरी लाट सुरू झाली आहे. ते रोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येवरून दिसत आहे. रुग्णसंख्या वाढीचा स्फोट जानेवारीच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. त्या रुग्ण संख्या ३० ते ४० हजारांपर्यंत पोचतील. त्यातील ९५ टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडणार नाही. त्यांना ऑक्सिजन लागणार नाही. उपचार करून लागलीच गृहविलगीकरणात त्यांना ठेवले जाईल. पाच टक्के रुग्णांना ऑक्सीजनची गरज भासेल, असा अंदाज आहे. त्यासाठी सर्वच ठिकाणी ऑक्सिजन बेड तयार आहेत. ऑक्सिजन प्लांटची जोडणी पूर्ण झाली की लागलीच आणखी ऑक्सिजन बेड वाढविण्यात येतील

omicron omicron in india
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गुलाबराव पाटील

या आहेत उपाययोजना

ओमिक्रॉनची रुग्णसंख्या वाढू द्यायची नसेल तर सर्वांनी मास्क लावणे गरजेचे आहे. लग्नात, सभासमारंभात जाणे टाळणे आवश्यक आहे. कोरोना नियमांचे पालन हेच तिसऱ्या लाटेला रोखू शकेल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com