घरात पिठ नाही म्हणून चोरले गव्हाचे पेाते; वायरी जाळतांना ते सापडले आणि समोर आल्या घटना 

रईस शेख
Thursday, 31 December 2020

घरात पिट नसल्याने चोरून आणलेल्या पेातं भर गहु घरातच दळून खाल्ला..घरफेाडीचा मला अनुभव नाही, नेहमीच दुकाने फोडतो.

जळगाव  ः घरात पिठ नसल्याने घरफोडीत गहू सापडल्याने पोते उचलून नेले, दुकानातून चोरलेल्या पैशांची दारु प्यायले.. अन्‌ भंगारात विकण्यासाठी वायरींग जाळताना पोलिसांना खबऱ्याने कळवल्याने एका रात्रीतून ३-४ घरफोड्या, दुकाने फोडणारी टोळी शहर पेालिसांनी अटक केली आहे.  

आवश्य वाचा- रेल्वे प्रवाशाचे प्राण वाचविणार्‍या रणरागिणीच्या पाठीवर कौतुकाची थाप

सतरा वर्षीय तीन अल्पवयीन संशयितांच्या टोळीला शहर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील टोळीचा म्होरक्या चिल्ल्या शेख, समीर शेख, मुन्न्या (नावे काल्पनिक) अशा तिघांनी २६ डिसेंबरच्या रात्री शहर पोलिस ठाण्याशेजारीच केळकर मार्केटमध्ये रिषभ होजिअरी व बाबा गारमेंट (दुकान नं ८) अशी दोन दुकाने फोडली होती. दुग्गड यांच्या दुकानातून ९ हजार, तर कटारिया यांच्या दुकानातून ६ हजारांची रोकड मिळाल्यावर भामट्यांनी बळीरामपेठेत मोर्चा वळवला. बळीराम पेठेत विजय काशिनाथ देशमुख यांच्या घराचे दार तोडून आतून गव्हाचे पोते, होमथीएटर, एलईडी टिव्ही चोरुन पोबारा केला हेाता. 

वायर जाळली अन्‌.. 
श्रेष्ठा अपार्टमेंटमध्ये भागचंद कुंदनलाल जैन यांच्या बांधकामावरुन इलेक्ट्रीक फिटींगचे वायरबंडल चेारीला गेले होते. अटकेतील ‘बच्चा गँग’ चार दिवसांपासून दारुसह पार्ट्या करत होती. आज चेारीची कॉपर वायर भंगारात विक्रीसाठी त्यांनी पेटवल्याने त्याचा धूर होऊन खबऱ्याने पोलिस नाईक अक्रम शेख, भास्कर टाकरे यांना कळवताच, दोघांसह सहाय्यक फौजदार विजय निकुंभ, उमेश भांडारकर,वासुदेव सोनवणे, रतन गिते यांच्या पथकाने शिवाजीनगर हुडको मधून बच्चा गँगला ताब्यात घेतले. संशयित अल्पवयीन असल्याने त्यांना बाल न्यायमंडळासमोर हजर करण्यात आले. गुन्ह्यातील साहित्य, एलईडी, जळालेले वायरबंडल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

आवश्य वाचा- देवासारखे धावून आले डॉक्टर ; गरोदर महिलेला वेळेवर उपचार मिळाला म्हणून वाचले प्राण -

गुन्ह्याची कबुली.. 
घरात पिट नसल्याने चोरून आणलेल्या पेातं भर गहु घरातच दळून खाल्ला..घरफेाडीचा मला अनुभव नाही, नेहमीच दुकाने फोडतो..रोकड मिळाल्यावर टेंन्शन नसते. पूर्वी ८ गुन्हे केले असून घरफोडीत पैसा कमी, सोने-चांदी व सामान चोरुन नेल्यावर विक्रीचे झंझट असल्याचेही त्याने पोलिस तपासांत सांगून टाकले. दारुच्या पार्टीसाठी आज वायर बंडल जाळून त्यातील तांबे विकणार होते मात्र त्यात ते अडकले. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: theft marathi news jalgaon police arrest younger gyang