Latest Marathi News | जळगाव : चोरट्यांनी घर फोडून रोकडसह दागिने लांबवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 theft

जळगाव : चोरट्यांनी घर फोडून रोकडसह दागिने लांबवले

जळगाव : शहरातील लक्ष्मीनगरातील नाथवाड्यामध्ये चोरट्यांनी घरफोडी करून सोने-चांदीचे दागिने व रोकड असा एकूण १ लाख ५५ हजार ९०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. (Latest Marathi News)

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरफराज इस्माईल तडवी (वय ६०, रा. लक्ष्मीनगर, नाथवाडा) कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. सरफराज कुटुंबीयांसह ख्वाँजा मोईनोद्दीन चिश्ती यांच्या दर्शनासाठी अजमेर (राजस्थान) येथे गेले होते. तडवी परिवाराने घरातून जातानाच १६ जुलैला संपूर्ण घर बंद करुन शेजाऱ्यांना लक्ष देण्याचे सांगत जळगाव सोडले. सलग तीन-चार दिवस घर बंद असल्याच्या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घर फोडून आत प्रवेश केला.

हेही वाचा: आयकर विभागाकडून अक्षय कुमारचा सन्मान, सर्वाधिक कर भरणारा अभिनेता ठरला

घरात बेडरुमच्या कपाटाचे लॉक तोडून कपाटातील सोन्याची व चांदीचे दागिने रोकड आणि मोबाईल असा एकूण १ लाख ५५ हजार ९०० रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. सरफराज तडवी दर्शनानंतर शुक्रवारी परतले. त्यांना घराचे दार तोडलेले आढळून आल्यावर त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. तडवी यांच्या तक्रारीवरून रात्री उशिरा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कठोरे करीत आहे.

हेही वाचा: Electric vehicle : बाजारात आणखी ३ ईलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध; किंमत फक्त...

Web Title: Thieves Broke Into The House And Stole Cash And Jewellery Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonCrime News