आयकर विभागाकडून अक्षय कुमारचा सन्मान, सर्वाधिक कर भरणारा अभिनेता ठरला | Akshay Kumar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshay Kumar

आयकर विभागाकडून अक्षय कुमारचा सन्मान, सर्वाधिक कर भरणारा अभिनेता ठरला

अक्षय कुमार बाॅलीवूडचा सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी एक आहे. वर्षात तो चार ते पाच चित्रपट करत असतो. एकाचे प्रमोशन संपत नाही तर दुसऱ्या चित्रपटाच्या चित्रीकरणात अक्षय कामात गुंतून जातो. या दरम्यान तो कुटुंबाबरोबर सुटीसाठी वेळही काढत असतो. अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) वेळेचे नियोजन प्रत्येकाला चक्रावून टाकते. तो बाॅलीवूडमध्ये (Bollywood News) सर्वात जास्त कर भरणारा अभिनेता आहे. या संबंधीच आता आयकर विभागाने (Income Tax) त्याचा सन्मान केला आहे. (Akshay Kumar Honored By Income Tax Department For Highest Tax Payer Actor)

हेही वाचा: रेल्वे अनुदान बंद केल्याने काॅमेडियन संतापला; म्हणाला, मोदींना...

चित्रीकरणात अक्षय

अक्षय कुमार सध्या इंग्लंडमध्ये आपला आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. पिंकव्हिला या संकेतस्थळानुसार अक्षयला एक सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तो हिंदी चित्रपट उद्योगात सर्वाधिक कर भरणारा अभिनेता आहे. त्याच्या वतीने त्याच्या टीमने हे सन्मानपत्र स्वीकारले आहे. गेल्या पाच वर्षांत त्याचा सतत भारतात सर्वाधिक कर भरणाऱ्या व्यक्तींमध्ये समावेश होतो.

हेही वाचा: Parineeti Chopra : परिणीती अन् प्रियंकाची धमाल पार्टी !

अक्षय सध्या इंग्लंडमध्ये जसवंतसिंह गिल यांच्या बायोपिकच्या चित्रीकरण करत आहे. तो ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतात परतू शकतो. त्यानंतर तो आपला आगामी चित्रपट 'रक्षाबंधन'च्या प्रमोशन करणार आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. यात त्याची सहकलाकार म्हणून भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) आहे. या व्यतिरिक्त अक्षयचा सेल्फी, राम सेतू, ओ माय गाॅड २ आणि बडे मियाँ छोटे मियाँ हे चित्रपट येणार आहेत.

Web Title: Akshay Kumar Honored By Income Tax Department For Highest Tax Payer Actor

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..