Latest Marathi News | अमळनेरात चोरट्यांची दिवाळी; दागिन्यांसह रोकड लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Burglary

Jalgaon : अमळनेरात चोरट्यांची दिवाळी; दागिन्यांसह रोकड लंपास

अमळनेर : कलागुरू आणि सर्वज्ञनगरात भाड्याने राहणाऱ्या दोघांकडे चोरट्यांनी घरफोडी करून दिवाळी साजरी केल्याची घटना घडली. यात सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली. याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील मंगरूळ येथील वायरमन विजय तुकाराम पाटील हे अमळनेर येथील कलागुरूनगर भागातील दीपक श्रीराम पाटील (रा. पिंपळगाव, ता. भडगाव) यांच्या घरात भाडेकरून म्हणून राहतात.(Thieves Diwali in Amalner Cash Lumpas with Jewellery Jalgaon Crime News)

हेही वाचा: Jalgaon : यज्ञेशच्या उपचाराचा मार्ग मोकळा; पालकमंत्र्यांचा मदतीचा हात

मात्र दिवाळी सणासाठी कुटुंब गावी गेल्याने चोरट्यांनी संधी साधत घरातून डल्ला मारला. तर दुसऱ्या घटनेत सर्वज्ञनगरातील राहुल विश्वास पवार (रा. इंदवे, ता. पारोळा) यांच्या घरात भूषण चिंतामण पाटील (रा. बेंद्रेपाडा, ता. जि.धुळे) यांच्या घरात भाडेकरून राहतात.

त्यांचेही चोरट्यांनी घरफोडून दागिने आणि रोकड लांबवली. यात ६० हजार रुपये किमतीचे २० ग्रॅमचे सोन्याची चैन, लहान मुलांचा चांदीचा करदोडा, हातात घालण्याचे कडे व पायात घालण्याचे पैंजन, १३ हजार रुपये रोख असा ७३ हजार रुपये किमतीचा ऐवज मंगळवारी (ता. २५) रात्री लंपास केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: Bhaubeej Special : राजकीय मतभेद,त्यापलिकडे नाते अभेद्य

टॅग्स :Jalgaoncrime