Jalgaon Crime News: घराबाहेर उभी कार चोरट्यांनी लांबविली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

thief

Jalgaon Crime News: घराबाहेर उभी कार चोरट्यांनी लांबविली

जळगाव : शहरातील नेहरूनगरमधील व्यवसायिकाची कार चोरट्यांनी घराबाहेरून चोरून नेली. जळगाव- मोहाडी रोडवरील नेहरूनगरमध्ये हेमंत मिठाराम बारी (वय ४९) परिवारासह वास्तव्याला आहेत.

बारी यांची शिरसोली येथे स्टील वर्क्स नावाची फॅक्टरी आहे. त्यांच्याकडे कार (एमएच १९ सीएफ ०९७४) कार आहे. ते कार घरासमोर दाराला लागूनच उभी करतात. मंगळवारी (ता. ७) रात्री दहाला हेमंत बारी यांनी कार घरासमोरच उभी केली होती. मध्यरात्री चोरट्यांनी कार अलगदपणे चोरून नेली. हेमंत बारी यांची पत्नी सीमा बारी बुधवारी (ता. ८) पहाटे पाचला उठल्यानंतर कार जागेवर दिसून आली नाही.

हेही वाचा: अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

हेमंत बारी यांनी कारचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, कार कुठेही मिळून आली नाही. याबाबत बारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक अल्ताफ पठाण तपास करीत आहे.