शिरसोलीत रात्रभर चोरट्यांचा उच्छाद

robbery
robberyesakal
Updated on

जळगाव : तालुक्यातील भादली येथे चोरट्यांनी एकाच रात्री सात बंद घरे फोडल्याची घटना ताजी असताना शिरसोलीतही चोरट्यांनी सहा घरे फोडून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.

शिरसोली येथील धनश्री हॉटेल जवळील प्लॉट भागात मध्यरात्री चोरट्यांनी एकाच रात्री ६ बंद घरे फोडली. रोकडसह लाखो रूपयांचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेले आहे. हा प्रकार सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आला.

robbery
व्यसनासाठी काहीपण! महादेव मंदिरातून घंट्यासह कलशाची चोरी

राजेंद्र रामा बारी यांच्या घरातून १५ हजार रुपयांची रोकड, महेंद्र रामदास चव्हाण यांच्या घरातून ५० हजार रुपये रोख व ६२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने, योगेश भीमराव देशमुख यांच्या घरातून ३५ हजार रूपये किंमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि सपना रवींद्र गोंधळे यांच्या घरातून १० हजार रूपये किंमतीचे ३ गॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ७२ हजारांचा ऐवज चोरून नेला. सुधीर भावराव पाटील आणि पुनमचंद विठ्ठल देवरे यांच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.

वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांच्यासह श्वान पथक, ठसे तज्ज्ञ पथकही घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधिकाऱ्यांनी घर मालकांशी संवाद साधून माहिती घेण्यात आली. महेंद्र रामदास चव्हाण यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

robbery
बनावट लग्नप्रकरणी फरार तिघांना अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Bhusawal green hydrogen project
Why were Jalgaon land officials arrested?
Jalgaon electricity supply controversy involving farmers
Smart Meter Bill
Marathi News Esakal
www.esakal.com