Jalgaon News : छत्तीस हजार शेतकरी किसान योजनेपासून वंचित

kisan yojna news
kisan yojna news esakal

जळगाव : प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेंतर्गत ३६ हजार ४९४ लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधार क्रमांकास जोडलेले नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांना या योजनेचा तेरावा हप्ता मिळणार नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी दिली.

डिसेंबर २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीतील तेराव्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी योजनेतील पात्र लाभार्थ्यांची बँक खाते आधारशी जोडणे बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ आधारशी संलग्न बँक खात्यामध्येच प्राप्त होणार आहे.

बँक खाते आधारशी संलग्न नसलेल्या प्रलंबित लाभार्थ्यांचे बँक खाते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत (आयपीपीबी) खाती उघडण्याची व ते खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची कार्यवाही शासनाकडील सुचनांनुसार टपाल विभागाकडून सुरू आहे. (Thirty six thousand farmers deprived of Kisan Yojana Effect of bank account not being linked to Aadhaar Posts campaign till February 7 for Aadhaar attachment Jalgaon News)

kisan yojna news
Jalgaon News : विवाहितेच्या छळप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

पीएम किसान लाभार्थ्याचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणी न केलेल्या प्रलंबित लाभार्थ्यांच्या गावनिहाय याद्या त्या गावच्या पोस्टमन, पोस्टमास्तरांकडे देण्यात आल्या आहेत. यादीतील लाभार्थ्यांना गावातील पोस्टमास्तर, पोस्टमन संपर्क करून इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत त्यांचे खाते सुरू करून खाते आधार क्रमांकास जोडणी करून देतील.

ही मोहीम ७ फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्यांचे आधारकार्ड व मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्यांचे बँक खाते आधारशी जोडणी करणे बाकी असेल, अशा प्रलंबित लाभार्थ्यांनी गावचे पोस्टमन, पोस्टमास्तर यांच्याशी संपर्क साधून इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) खाते सुरू करून हे खाते आधार क्रमांकास जोडणी करून घ्यावे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

kisan yojna news
Jalgaon Robbery News : जळगावात मध्यरात्री सशस्त्र धाडसी दरोडा; रोकड, दागिन्यांसह दुचाकी चोरीस

आधार संलग्न करण्यासाठी प्रलंबित शेतकरी असे

तालुका--शेतकरी

अमळनेर--२,८८०

भडगाव--१,९६८

भुसावळ--१,२७७

बोदवड--१,३९४

चाळीसगाव--३,५३५

चोपडा--२,७२२

धरणगाव--२,२३२

एरंडोल--२,१५३

जळगाव--२,२६२

जामनेर--३,२८७

मुक्ताईनगर--२,१५४

पाचोरा--२,५०३

पारोळा--२,३९०

रावेर--२,७१९

यावल--३,०१८

एकूण--३६ हजार ४९४

kisan yojna news
Jalgaon News : विवाहितेच्या छळप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com