Online Job Fair : 30, 31 जानेवारीला ऑनलाइन रोजगार मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jobs fair in jalgaon

Online Job Fair : 30, 31 जानेवारीला ऑनलाइन रोजगार मेळावा

जळगाव : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागातर्फे ३० व ३१ जानेवारीला रोजगार मेळावा होणार आहे. (To provide employment opportunities to educated unemployed Online job fair on 30th 31st January jalgaon news)

मेळाव्यात नोकरीइच्छुक उमेदवारांसाठी महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यांमधील एकूण ११५ रिक्तपदे भरण्याविषयी कळविले आहे. मेळाव्याचा इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा.

तसेच अल्पसंख्याक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना ॲप्लाय करण्यासाठी सेवायोजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या यूजर आयडी व पासवर्डने लॉग-इन करून ॲप्लाय करावा.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Crop Loan : नगरदेवळ्यातील शेतकऱ्यांना पिक विमा रक्कमेची प्रतीक्षा

ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जाऊन नावनोंदणी करावी. नंतर आपल्या यूजर आयडी व पासवर्डने लॉग-इन करून ॲप्लाय करावा.

काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी पावणेदहा ते सायंकाळी सव्वासहा) या वेळेत कार्यालयात दूरध्वनी ०२५७-२९५९७९० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त वि. जा. मुकणे यांनी केले आहे.

हेही वाचा: Rahibai Popere: आत्महत्या रोखण्यासाठी जोडधंदा करावा : पद्मश्री राहीबाई पोपेरे