जळगाव : वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले; 4 लाखांचा मुद्देमाल जप्त

वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर शहर पोलिसांनी पकडले.
Tractor
Tractoresakal

चाळीसगाव (जि. जळगाव) : शहरातून अवैध वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर शहर पोलिसांनी गुरुवारी (ता. १२) सकाळी सातला पकडले. याप्रकरणी पोलिसांनी चालकाला अटक करून ट्रॅक्टरसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तालुक्यातील डेराबर्डीकडून शहराकडे येणाऱ्या एका विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरवर पोलिसांना संशय आला. शहर पोलिसांनी ट्रॅक्टरला थांबवून कसून चौकशी केली. ट्रॉलीत ७ हजार रुपयांची सव्वा ब्रास वाळू आढळून आली. शहर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन तीन लाख ५० हजार रुपयांचे ट्रॅक्टर, ५० हजार रुपयांची एक तपकिरी रंगाची ट्रॉली व वाळू, असा एकूण ४ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केली. निखिल सुनील कुढे (वय २३, रा. एम. जे. नगर, चाळीसगाव) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. पोलिस कर्मचारी विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस कर्मचारी भूषण पाटील तपास करीत आहे.

Tractor
धुळे : जनावरांची अवैध वाहतूक करणारे ताब्यात
Tractor
अवैध बायोडिझेलची जोमाने विक्री; विक्रेत्यांना अभय कोणाचे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com