Jalgaon News : वाटिकाश्रमजवळ महामार्गावर हवाय गतिरोधक; नागरिकांचे प्रशासनाला निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon News

Jalgaon News : वाटिकाश्रमजवळ महामार्गावर हवाय गतिरोधक; नागरिकांचे प्रशासनाला निवेदन

जळगाव : शहरातून गेलेल्‍या महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून, यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. खोटेनगरपासून भरधाव वेगाने वाहन येत असल्‍याने अपघात होतात. यामुळे द्वारकानगर थांब्‍याच्‍या दोन्‍ही बाजूने गतिरोधक आवश्‍यक आहे. त्यासाठी द्वारकानगरातील रहिवाशांनी सोमवारी (ता. ९) जिल्‍हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाला गतिरोधक टाकण्यासंदर्भात निवेदन दिले.

हेही वाचा: योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

दोन्‍ही बाजूंनी भरावचीही मागणी

राष्‍ट्रीय महामार्गावरील वाहनांची वर्दळ अधिक आहे. यात महामार्गाच्‍या दोन्‍ही बाजूंनी खोल भाग आहे. येथे अगदी साईडपट्ट्याही नाहीत. यामुळे वाहन किंवा नागरिकांना उभेही राहता येत नाही. मुख्‍य म्‍हणजे द्वारकानगर थांब्‍यावर रस्‍ता क्रॅास करताना शालेय विद्यार्थी, नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्‍ता ओलांडावा लागतो. यामुळे अपघात होण्याची शक्‍यता अधिक आहे.

याच दरम्‍यान गेल्‍या काही दिवसांमध्‍ये अपघात होऊन सहा ते सात जणांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे महामार्गावर गतिरोधक टाकण्यासोबत महामार्गाच्‍या दोन्‍ही बाजूंनी भराव टाकून रस्‍त्‍याचे रूंदीकरणाची मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा: Jalgaon News: विकासासाठी शासनाकडून 200 कोटी मंजूर; फडणवीस, महाजन यांच्या उपस्थितीत निर्णय

पथदीप नसल्‍याने महामार्गावर अंधार

विशेष म्‍हणजे खोटेनगरपर्यंत महामार्गाचे रूंदीकरण झाले आहे. याठिकाणी अद्याप पथदीप लागलेले नाहीत. तसेच खोटेनगरच्‍या पुढे गिरण नदी पुलापर्यंत पथदीप नाहीत. यामुळे महामार्गावर संपूर्ण अंधार पसरलेला असतो. लाईट नसल्‍याने अंधारामुळे वाहनांचा अंदाज येत नसल्‍याने अपघात होत आहेत.

आंदोलनाचा इशारा

द्वारकानगरवासियांनी निवेदन देऊन गतिरोधक व महामार्ग रूंदीकरणाची मागणी केली आहे. नागरिकांच्‍या मागणीवर काही तोडगा न निघाल्‍यास रास्‍ता रोको आंदोलनाचा इशारा नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

हेही वाचा: Jalgaon News : बाह्मणे गावाने जपली बिनविरोधाची परंपरा! आमदारांची सदिच्छा भेट

अप्‍पर जिल्‍हाधिकारी प्रवीण महाजन, ‘नाही’चे प्रकल्‍प संचालक चंद्रकांत सिन्‍हा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. निवेदन देतेवेळी द्वारकानगरमधील स्‍वप्‍नील भांडारकर, विनोद पाटील, मनोहर साळुंखे, राजेश सोनवणे, पंकज पाटील, सुशील पाटील, संदीप पाटील, सोमनाथ लोखंडे, श्रीमती सिसोदीया, संगीता महाजन, रंजना पाटील, सौ. शिंदे, सौ, लोखंडे आदी उपस्थित होते.