दौंड-मनमाड दरम्यान मालगाडीचे डब्बे घसरले; चार रेल्वे गाड्या रद्द

चेतन चौधरी 
Wednesday, 23 December 2020

मालगाडीचे 12 डब्बे घसरल्यामुळे पुढील लांब गाड्या वळविण्यात आल्या तर काही गाड्या रद्द केल्या आहेत. अजूनही मालगाडीचे डब्बे उचलण्याचे काम सुरूच आहे.

भुसावळ : दौंड-मनमाड दरम्यान काल (ता. 22) रात्री 12 वाजेच्या सुमारास मालगाडीचे 12 डब्बे घसरल्यामुळे रेल्वे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

आवश्य वाचा- जळगावकर सावधान ः थंडीचा जोर वाढताच चोरटे सक्रिय, तीन ठिकाणी घरफोड्या

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड-मनमाड दरम्यान श्रीगोंदा ते बेलवंडी स्थानकांदरम्यान अहमदनगर जवळ काल(ता. 22) रात्री मालगाडीचे 12 डब्बे घसरल्यामुळे पुढील लांब गाड्या वळविण्यात आल्या तर काही गाड्या रद्द केल्या आहेत. अजूनही मालगाडीचे डब्बे उचलण्याचे काम सुरूच होते.

गाड्या रद्द केल्या
23 रोजी सुटणारी 02117 पुणे-अमरावती, 01039 कोल्हापूर-गोंदिया, 02016 पुणे-मुंबई, तर 25 रोजी सुटणारी 01040 गोंदिया-कोल्हापूर एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

मार्गात बदल झालेल्या गाड्या
पुणे-लोणावळा-पनवेल-इगतपुरी-मनमाड मार्गे गाड्या वळविण्यात आल्या आहेत. यात 22 रोजी सुटलेल्या 02779 वास्को-हजरत निजामुद्दीन, 01039 कोल्हापूर-गोंदिया, 00103 सांगोला-नरखेर किसान स्पेशल, 06229 म्हैसूर-वाराणसी, 06527 बेंगलुरू-हजरत निजामुद्दीन, तर 23 रोजी सुटलेली 02149 पुणे-दानापूर स्पेशल एक्सप्रेस या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहे.

आवर्जून वाचा- ‘आमदनी अठ्ठन्नी, खर्चा रुपय्या’ असा नगरपालिकेचा कारभार ! -

मनमाड-इगतपुरी-पनवेल-लोणावळा-पुणे मार्गे वळविण्यात आलेल्या गाड्यांमध्ये 21 रोजी सुटलेली 01040 गोंदिया-कोल्हापूर, 22 रोजी सुटलेली 06524 हजरत निजामुद्दीन-येसवंतपूर, 02150 दानापूर-पुणे, 06501 अहमदाबाद-यशवंतपूर, 01078 जम्मू तवी-पुणे, 02780 हजरत निजामुद्दीन- वास्को स्पेशल, 02224 अजनी-पुणे, 01040 गोंदिया-कोल्हापूर स्पेशल, 02150 दानापूर-पुणे स्पेशल यांच्या मार्गात बदल झाले आहे. जळगाव-सूरत-वसई रोड-पनवेल-लोणावळा मार्गे वळविण्यात आलेल्या गाड्यांमध्ये 02136 मंडुआडीह-पुणे स्पेशल, दौंड-कुर्डूवाडी-लातूर रोड-पिंपळखुटी-नागपूरमार्गे गाड्या वळविण्यात आलेल्या गाड्यांमध्ये 01033 पुणे-दरभंगा स्पेशल आहे. 01077 पुणे-जम्मू तवी ही गाडी पुणे-कर्जत-पनवेल-वसई रोड-रतलाम-कोटा-मथुरा जंक्शनमार्गे वळविण्यात आली. 06528- हजरत निजामुद्दीन-बेंगलुरू स्पीकल ही गाडी खंडवा-अंकई-पूर्णा-परभणी लातूर रोड-कुर्डूवाडी-वाडीमार्गे वळविण्यात आली आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: train accident marathi news bhusawal train cancellation change train route