मध्य रेल्वेचा आज रात्रीपासून पॉवर ब्लॉक ! आठ गाड्या रद्द

मध्य रेल्वेचा आज रात्रीपासून पॉवर ब्लॉक ! आठ गाड्या रद्द

भुसावळ : मध्य रेल्वे द्वारा कल्याण - कसारा दरम्यान गर्डर टाकण्याचे काम केले जाणार असून, 13 आणि 14 मार्चला रात्री ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे 8 रेल्वे गाड्या रद्द, दोन गाड्याच्या मार्गात बदल तर आठ गाड्या मार्गात थांबविण्यात येतील. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

मध्य रेल्वे तर्फे 13 आणि 14रोजी  रात्री 2 वाजेपासून ते 07.25 वाजेपर्यंत कल्याण आणि कसारा खंड अप आणि डाउन लाइन मध्ये 3 स्टेशन वर ट्रैफिक आणि पावर ब्लॉक करणार आहे. 02.15 वाजेपासून ते 7.15 वाजेपर्यंत खडावली आणि वासिंद स्टेशन दरम्यान लेवल क्रॉसिंग गेट नं. 61 मध्ये आरएच गर्डर टाकले जाणार आहे. 2.25 वाजेपासून ते 7.25 वाजेपर्यंत आसनगांव आणि आटगाव स्टेशन दरम्यान लेवल क्रासिंग गेट नंबर 68 वर आरएच गर्डर बसविण्यात येणार आहे.2 वाजेपासून ते  4.30 वाजेपर्यंत सड़क क्रेन द्वारा एफओबी गर्डर्स लॉचिंग होईल. या ब्लॉक मुळे , भुसावळ मंडळ मधुन जाणाऱ्या गाड्यांचे नियमन केले जाणार आहे. 

रद्द झालेल्या गाड्या
गाडी क्रमांक 01141 डाउन मुंबई आदिलाबाद विशेष 12 मार्चला रद्द. 13 मार्चला गाडी क्रमांक 01142 अप आदिलाबाद मुंबई विशेष, 07058 अप सिकंदराबाद मुंबई विशेष, 07617 अप नांदेड मुंबई विशेष, 02198 अप जबलपूर कोईमतुर विशेष, 14 मार्चला 07057 डाउन मुंबई सिकंदराबाद विशेष, 07618 डाउन मुंबई नांदेड विशेष, 15 मार्चला 02197 डाऊन कोईमतूर जबलपूर विशेष या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.


अप स्पेशल गाड्यांची रि-शेडूलिंग
ब्लॉकमुळे काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. यात गाडी क्रमांक 02112 अप अमरावती मुंबई आणि गाडी क्रमांक 02106 अप गोंदिया मुंबई या गाड्या 13 मार्चला प्रस्थान स्टेशन पासून तीन तास उशिराने धावतील. 

आवर्जून वाचा- धानोरा जि. प. शाळेतील शिक्षक कोरोना बाधित

मार्ग परिवर्तन
गाडी क्रमांक 02541 अप गोरखपुर लोकमान्य टिळक विशेष आणि गाडी क्रमांक हावडा-मुंबई विशेष या गाड्यांना प्रस्थान स्टेशन 12 मार्चला जळगाव,वसई रोड मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस ला जाईल. त्यांना भिवंडी रोड येथे थांबा देण्यात येईल.

विशेष गाड्यांचे नियम
काही विशेष गाड्यांना इगतपुरी आणि कल्याण स्टेशन दरम्यान एक ते तीन तासाकरिता थांबविण्यात येईल आणि निर्धारित वेळेमध्ये उशिराने पुढील स्टेशन येथे पोहचेल. यात 12 मार्चला 02138 फिरोजपुर-सीएसएमटी स्पेशल, 13 मार्चला गाडी क्रमांक 01237 नागपुर-मडगाँव स्पेशल, 02618 हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम स्पेशल 02190 नागपुर-सीएसएमटी स्पेशल या गाड्यांना मार्गात थांबविण्यात येईल. तर डाउन मार्गावरील कल्याण आणि टिटवाला दरम्यान आणि निलजे स्टेशन मध्ये 13 मार्चलागाडी क्रमांक 01236 मडगाँव- नागपुर विशेष, 14 मार्चला 02259 मुंबई-हावड़ा स्पेशल, 02129 एलटीटी-प्रयागराज स्पेशल, 05017 एलटीटी- गोरखपुर स्पेशल या गाड्यांना थांबविण्यात येणार आहे.  

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com